शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
2
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
5
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
6
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
7
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
8
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
9
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
11
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
12
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
13
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
14
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
15
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
16
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
17
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
18
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
19
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
20
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही

वाहन परवान्यासाठीची भटकंती थांबली

By admin | Updated: February 20, 2016 03:05 IST

आरटीओ शिबिर हे महिन्यातून एक दिवस प्रत्येक तालुका स्तरावरील विश्रामगृहात आयोजित केले जाते. परंतु ऐन वेळेवर विश्रामगृहामार्फत ..

शिबिर सुरू : वारंवार रद्द होत असलेल्या शिबिरांनी आर्वीकर झाले होते हैराणआर्वी : आरटीओ शिबिर हे महिन्यातून एक दिवस प्रत्येक तालुका स्तरावरील विश्रामगृहात आयोजित केले जाते. परंतु ऐन वेळेवर विश्रामगृहामार्फत शिबिर घेण्याकरिता जागा व सोयीसुविधा देण्यास नकार दिल्या जात असल्यामुळे आरटीओ विभागाला हे शिबिर रद्द करावे लागले. पण आर्वी येथील १८ फेब्रुवारी ला रद्द झालेले शिबिर शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या पुढाकाराने त्याचवेळी सुरू झाले.जिल्ह्यातील आरटीओ विभागामार्फत तालुक्याच्या ठिकाणी मोटार वाहन विषयक शिबिर महिन्यातून एकदा आयोजित केले जाते. आरटीओ विभागामार्फत संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले जात असतानाही ऐनवेळेवर विश्रामगृहात जागा न दिल्यामुळे शिबिर रद्द करावे केले जाते. याचा नाहक त्रास व भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागतो. मागील तीन महिन्यांपासून हे शिबिर सतत रद्द होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे. याकरिता शिवसेनेमार्फत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. यासंबंधीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी यांना देण्यात आले. फेब्रुवारी महिन्याच्या १८ तारखेला आयोजित असलेले शिबिरही असेच विश्रामगृहातील खोली रिकामी नसल्याचे कारण सांगून पुन्हा रद्द करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातून परवान्याकरिता आलेल्या ३०० ते ४०० नागरिकांना पुन्हा हिरमोड झाला. ही बाब लक्षात येताच शिवसेनचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख यांनी कार्यकर्त्यांसोबत शिबिराचे ठिकाण गाठून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व विश्रामगृहातील खोली खाली करून शिबिर सुरू करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे नागरिकांना होणारा हिरमोड थांबला आहे.आर्वी येथील रद्द झालेल्या शिबिरातील नागरिकांना कारंजा येथे मागील ८ फेब्रुवारीला शिबिरात बोलावले होते. पण कारंजा येथील शिबिरही देखील रद्द झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाला खोली राखीव ठेवण्याकरिता आरटीओ विभागामार्फत पत्र दिले असतानाही खोली रिकामी का ठेवल्या जात नाही.(शहर प्रतिनिधी)