शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

बचत गटांच्या उत्पादन विक्रीकरिता वर्धिनी महोत्सव

By admin | Updated: March 17, 2017 02:01 IST

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता बचत गटांनी

स्मिता माहुरकर यांचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट रेन्बो कार्यक्रम : सूरसंगम मराठी, हिंदी गाण्याची मेजवानी वर्धा : स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तु व कलाकृती तथा ग्रामीण खाद्य पदार्थाची जिल्हास्तरीय प्रदर्शनी व विक्रीकरिता वर्धिनी महोत्सवाचे अयोजन करण्यात आले आहे. येथील जुना आरटीओ मैदानावर १७ ते २० मार्च या कालावधीत हा महोत्सव आहे. महोत्सवाचे उद्घाटन १७ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस राहणार आहे. तर आ. डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, रणजित कांबळे, अमर काळे, नागो गाणार, अनिल सोले यांच्यासह जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, सभापती वसंता पाचोडे, सभापती चेतना मानमोडे, श्यामलता अग्रवाल, वसंत आंबटकर यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसहायता बचत गट हे एक प्रभावी माध्यम आहे. जिल्ह्यात स्वयंसहायता गटाची उत्कृष्ट पायाभरणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत करण्यात आली आहे. तसेच या गटांना निरनिराळे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येऊन महिलांच्या शाश्वत उपजिविकेकडे लक्ष देण्यात येते व यातूनच स्वयंसहायता गट स्वत:च्या वस्तु उत्पादीत करतात. या उत्पादित केलेल्या मालाची प्रदर्शनी विक्री करून बचत गट सक्षम होण्यासाठी वर्धिनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कलाकृती व विविध खाद्य पदार्थाचा आनंद घेता येईल. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता सुरभी ठोमणे प्रस्तुत सुरसंगम हा मराठी, हिंदी गितांचा कार्यक्रम, १८ मार्चला सायंकाळी कला अर्पण मंच प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा व १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता नात्याचे रंग उलगडणारा, लेखिका व अभिनेत्री डॉ. स्मिता माहुरकर प्रस्तुत ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट रेन्बो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला वर्धेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यांनी केले आहे.(प्रतिनिधी)