शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

वैष्णव जन तो ते ने कहीएं...

By admin | Updated: July 20, 2014 00:06 IST

संत कबीर, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मा यांचे चित्रण हुबेहूब गायनाच्या माध्यमातून डॉ. परमानंद आणि मनु यादव यांनी मांडले. त्यामुळे सेवाग्राम आश्रम

परमानंद यांच्या गायनाने सेवाग्राम आश्रमवासी भारावलेवर्धा : संत कबीर, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मा यांचे चित्रण हुबेहूब गायनाच्या माध्यमातून डॉ. परमानंद आणि मनु यादव यांनी मांडले. त्यामुळे सेवाग्राम आश्रम परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सेवाग्राम या ठिकाणी शनिवारी कोलकाताच्या पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने भजन गायनाचा कार्यक्रम पार पडला.संगीत क्षेत्रातील विख्यात, तज्ज्ञ असलेले डॉ. परमानंद यांनी संत कबीर, महात्मा गांधीजींचे विचार आपल्या सुरेल आवाजातून उपस्थितांपर्यंत पोचविले. त्यामध्ये त्यांनी आपल्या गायनाची सुरुवातच ‘वैष्णव जन तो ते ने कहीएं’ या महात्मा गांधीजींच्या आवडत्या भजनाने केली. त्यामुळे परिसरात एकूणच भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली होती. एकापाठोपाठ एक अशा सुरेल एकूणच भक्तीमय वातावरणाची वाहवा मिळवत त्यांनी मने जिंकली. गायन करतानाच त्यांनी गीत, भजनांचा अर्थही विषद करून सांगितल्याने भाषेची काठिण्यपातळी रसिकांना सहज व सोपी झाल्याने गीत, भजनातील गोडवा अधिकच रसिकांना चाखायला मिळाला.‘गुरूने बनाया चेला, नइया.... लागी लागी रे....’ आदी गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यासह डॉ. परमानंदांनी कुमार गंधर्व यांची भजनेही उपस्थितांना ऐकवून आपल्या कलेचे प्रदर्शन उत्तमरित्या सादर केले. त्यांच्या आवाजाने रसिकही सुखावले. संत कबीर, महात्मा गांधीने, कुमार गंधर्व यांचे विचार गायनाच्या माध्यमातून ऐकावयास मिळाल्याने तरूण वर्गासह वयोवृद्धांपर्यंत त्यांच्या कलेचे केलेले गुणगान याठिकाणी ऐकावयास मिळाले.डॉ.परमानंद यांच्या गायन कार्यक्रमानंतर उत्तरप्रदेशात वीरतेचे गुणगान गाऊन उत्तरप्रदेशातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना धीर देणारे, केंद्र सरकारच्या बिस्मिला खाँ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले वाराणसीचे मनू यादव यांनीही लोकगीतांच्या माध्यमातून त्यांची कला सादर केली. सन १८५७ चा उठाव आपल्या गायनातून उपस्थितांच्या डोळ्यासमोर हुबेहुब उभा केला. ‘हमरे भैया वतने की सिपाही....’ या त्यांच्या गाण्याने सर्वांच्याच अंगावर शहारे उभे राहिले. लोकगीतातच आत्मा असल्याचे त्यांनी आपल्या गीत सादरीकरणातून दाखवून दिले. तसेच उपस्थितांची वाहवा मिळविली.(जिल्हा प्रतिनिधी)