शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाघाने पाडला गाईचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:41 IST

गिरड सहवन परिक्षेत्रातील तावी जंगलाला लागून असलेल्या शेतातील गोठ्यात प्रवेश करून गाय ठार करण्यात आली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली असून सदर गाय वाघाने ठार केली असावी असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देतावी शिवारातील घटना : शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : गिरड सहवन परिक्षेत्रातील तावी जंगलाला लागून असलेल्या शेतातील गोठ्यात प्रवेश करून गाय ठार करण्यात आली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली असून सदर गाय वाघाने ठार केली असावी असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. या घटनेमुळे शेतकºयाचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्ताला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.प्राप्त माहितीनुसार, तावी गावातील शेतकरी राम नरेश यादव यांच्या मालकीची गाय शेतातील गोठ्यात बांधण्यात आली होती. दरम्यान वाघाने गाईवर हल्ला करून तिला ठार केले. सकाळी ही घटना लक्षात येताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे पी. डी. बाभळे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक विजय आडकीने, वनरक्षक एस. जे. उरकुडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी स्वप्नील सोनवणे यांनी गाईचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आहे.हिंगणीसह शिवणगावात बिबट्याची दहशतबोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शिवणगाव व हिंगणी शेतशिवारात सध्या बिबट्याचे वास्तव्य आहे. इतकेच नव्हे, तर या बिबट्याने काही पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना गतप्राण केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे. प्राप्त माहितीनुसार, शिवणगाव शेतशिवारात गोठ्याबाहेर बांधून असलेल्या कालवडीला बिबट्याने ठार केले. तर याच भागातील गोठ्यात शिरून बिबट्याने एक वासरू ठार केले आहे. तर हिंगणी गावात घराच्या अंगणात बाधून असलेली शेळी बिबट्याने ठार केली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये बिबट्याबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाºयांनी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.

टॅग्स :Tigerवाघ