शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

12 जागी सहा तर 20 केंद्रांवर तीन दिवस व्हॅक्सिनेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:30 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महालसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पहिल्या फळीतील कोविड योद्धांना तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस ...

ठळक मुद्देतिसऱ्या टप्प्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : अतिजोखीमेच्या गटातील व्यक्तींना कोविड लसीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र क्रमप्राप्त

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महालसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पहिल्या फळीतील कोविड योद्धांना तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस दिल्यानंतर आता १ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांसह ४५ ते ६० वयोगटातील अतिजोखमीच्या व्यक्तींना कोविडची व्हॅक्सिन दिली जात आहे. लसीकरण केंद्रांवरील नागरिकांची गर्दी टाळता यावी तसेच कुठलाही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये या हेतूने जिल्ह्यातील १२ ठिकाणी आठवड्यातून सहा दिवस तर २० केंद्रांवर आठवड्यातून तीन दिवस नागरिकांना कोरोनाची लस नि:शुल्क दिली जाणार आहे. कोविडशी लढा देण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती विकसीत होण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने लसीचे दोन डोज घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

लसीकरण केंद्रांवरही केली जाणार नोंदणीज्या लाभार्थ्यांना स्वत: नोंदणी करता आली नाही अशा व्यक्तींना लसीकरण केंद्रावरच नोंदणी करण्याची सूविधा उपलब्ध राहणार आहे. पण त्याकरिता लाभार्थ्याना आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, त्यांना कुठला आजार आहे त्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत ठेवून ते नोंदणी करणाऱ्याला देणे आवश्यक राहणार आहे.

तीन खासगी केंद्रावर मोजावे लागेल लसीसाठी २५० रुपयेकेंद्र शासनाच्या सूचनेवरून जिल्ह्यात तीन खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यात सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, आर्वी येथील डॉ. राणे हॉस्पिटल तर हिंगणघाट येथील डॉ. लोढा हॉस्पिटलचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी लस घेऊ इच्छिणाऱ्यांना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीसाठी नाममात्र शुल्क म्हणून २५० रुपये मोजावे लागणार आहे. तर शासकीय लसीकरण केंद्रांवर नि:शुल्क लस दिली जाणार आहे. 

लस घेऊ इच्छिणाऱ्यांना सुविधा व्हावी म्हणून लसीकरण केंद्रांवरही नोंदणी करण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असले तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करून घरूनच नोंदणी केल्यास लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होणार नाही. लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस पूर्णपणे सुरक्षीत असून नागरिकांनीही कुठलही भीती मनात न बाळगता स्वयंस्फूर्तीने शासकीय लसीकरण केंद्रांवर जावून कोरोनाची लस टोचून घ्यावी. शासकीय केंद्रांवर लस नि:शुल्क देण्यात येणार आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस