शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

दोन वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्तच

By admin | Updated: June 20, 2015 02:30 IST

आर्वी तालुक्यात विरूळ(आ.) हे सर्वात मोठे गाव आहे. येथे प्रथम श्रेणीचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे.

पशुपालकांचे नुकसान : प्रशासन उदासीनविरुळ (आकाजी) : आर्वी तालुक्यात विरूळ(आ.) हे सर्वात मोठे गाव आहे. येथे प्रथम श्रेणीचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्याला विरूळ सहीत २२ गावे गावे जोडल्या गेली आहे. परंतु दोन वर्षांपासून येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्तच आहे. त्यामुळे जनावरांवर कसे उपचार करावे, असा प्रश्न शेतकरी वर्गाला सतावत आहे. दोन वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्तच आहे. त्यामुळे सर्व दवाखान्याचा भार सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर होता. त्यात सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी यांचीही बदली साहूर येथे झाल्याने येथे आता केवळ दोनच कर्मचारी असून या दोन कर्मचाऱ्यांच्याच भरोश्यावर २२ गावांचा डोलारा चालतो. त्यात हे दोन्हीही कर्मचारी मुख्यालयी रहात नाही. पावसाळ्याच्या दिवसात जनावरे कधी आजारी पडेल याचा नेम नसतो. मागील महिन्यात अज्ञात रोगाने २० बकऱ्या दगावल्या तरीही या दवाखान्यात डॉक्टरांचा पत्ताच नाही. या दवाखान्याचा तात्पुरता कार्यभार रोहण्याच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे असून तो अधिकारी विरूळच्या दवाखान्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून उपचाराअभावी जनावरे दगावण्याचा धोका असतो. तालुक्यात सर्वात मोठा दवाखाना म्हणून ओळख आहे. परंतु या दवाखान्यात दोन वर्षापासून अधिकारी नसल्याने आश्चर्य व्यक्त आहे.(वार्ताहर)