शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांवर दबावतंत्राचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:42 IST

नजिकच्या भूगाव येथील अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात सोमवारी अकोला येथील डॉ. पंजाबराव विद्यापीठ अकोला येथील काही अधिकाऱ्यांनी येत या महाविद्यालयावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. आपण इतर महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे सांगत त्याबाबत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही वेळ तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देकृषी महाविद्यालयातील प्रकार : विद्यार्थ्यांची पोलीस कचेरीवर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : नजिकच्या भूगाव येथील अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात सोमवारी अकोला येथील डॉ. पंजाबराव विद्यापीठ अकोला येथील काही अधिकाऱ्यांनी येत या महाविद्यालयावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. आपण इतर महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे सांगत त्याबाबत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही वेळ तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी सावंगी पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी काय कार्यवाही केली हे वृत्तलिहिस्तोवर कळू शकले नाही.शैक्षणिक सत्र २०१८-१९ संदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. या बाबत २-३ दिवसात निकाल लागण्याची शक्यता आहे. या शाळेवर प्रशासक नेमले आहे. याच दरम्यान अकोला येथील विद्यापीठातील काही अधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याचा ई-मेल २४ रोजी प्राप्त झाला. त्या अनुषंगाने सोमवारी डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला येथील राम गावंडे, के. डब्ल्यू बोने, पी. एस. साळुंके यांनी भुगाव भागातील सदर महाविद्यालय गाठले. यावेळी सुरूवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रकरण न समजावून सांगता त्यांना पोलिसांचा धाक दाखवून त्यांच्या खाजगी विद्यालयाच्या नाव असलेल्या फार्मवर स्वाक्षऱ्या घेण्यास सुरूवात केली. हा प्रकार आपल्यावर अन्यायकारक असल्याचा ठपका ठेवत विद्यार्थ्यांनी सदर अधिकाऱ्यांना विचारणा केली. परंतु, त्यांचकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.