शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

नव्या तंत्राचा आर्थिक फसवणुकीसाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:08 IST

सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात लोकहितार्थ केल्या जात असला तरी त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना लाखो रुपयांनी गंडा घातला जात असल्याची अनेक प्रकरणे पोलीस कचेरींमध्ये दाखल आहेत.

ठळक मुद्देसावधान : ओटीपी देताच लाखोंनी घातला जातोय गंडा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात लोकहितार्थ केल्या जात असला तरी त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना लाखो रुपयांनी गंडा घातला जात असल्याची अनेक प्रकरणे पोलीस कचेरींमध्ये दाखल आहेत. याच पाश्वभूमीवर आता सदर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी नवीन युक्ती लढवून आपले काम फत्ते करण्यास सुरुवात केल्याचे स्थानिक पोलिसांच्या सायबर सेलच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनीही नागरिकांना कुणालाही ओटीपी न देता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.‘एमपिन’चा नवीन फंडा सध्या फसवणूक करणाºयांकडून वापरला जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून वापरल्या जाणारा हा एमपिनचा फंडा त्यांच्यासाठी अतिशय सुविधाजनक आणि फायद्याचा ठरत आहे. तर हाच फंडा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा तोट्याचा ठरत आहे. एमपिनचा वापर करून होणाºया फसवणुकीला आळा घालण्यासाठी सायबर सेलच्या पोलिसांनी कंबर कसली असून त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे हे पोलिसांसमोर मोठे आवाहनच ठरत आहे. अनेकांना गंडा घालणाऱ्यांच्या हाती एमपिन लागल्यास त्याचा वापर करून हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती सदर व्यक्तीच्या बँक खात्यात किती रक्कम आहे याची माहिती जाणून घेऊ शकतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या मोबाईलवर तुमच्या अकाऊंटचे एमपिन अ‍ॅक्टीव्हेट करून घेतात. त्यामुळे प्रत्यक्ष ट्रान्झेंक्शनचा ओटीपीही त्यांना त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होतो.त्यानंतर सदर फसगत करणारी व्यक्ती त्या व्यक्तीच्या बँक खात्यातील रक्कम दुसºया बँक खात्यात वळती करून किंवा ती काढून त्याची फसवणूक करतो. ज्यावेळी बँकेतील रक्कमेची पाहणी केली जाते त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे नागरिकाच्या निदर्शनास येते.एमपिन म्हणजे मोबाईल पिनबँकेचे विविध व्यवहार आॅनलाईन पद्धतीचा वापर करून घरूनच करता यावे यासाठी प्रत्येक बँकेने एमपिनची सूविधा खातेदारांना दिलेली आहे. याचाच फायदा आता बँक फसवणुकीमध्ये लिप्ट असलेल्या गुन्हेगारांनी घेणे सुरू केले आहे. आता एमपिनमुळे बँक ग्राहकांची फसवणूक करणे सोपे झाले असून या प्रकारांना प्रतिबंध घालणे कठीण ठरत आहे. यूपीआयचा वापर करून रक्कम वळती केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार रोखणे जीकरीचे ठरत आहे. गुन्हेगार बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश आदी ठिकाणांहून हे काम फत्ते करीत असून तेथील बँकेत ही रक्कम वळती करतात. परंतु, त्यांचा शोध घेताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते. बहूदा खरा आरोपी पोलिसांच्या गळालाही लागत नसल्याचे वास्तव आहे. एमपिन म्हणजे मोबाईल पिन असून ओटीपी व एमपिन कुणालाही न देणे हाच सर्वात मोठा प्रतिबंध आहेत.एटीएम घेतले जातेय किरायानेनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक प्रकरणे पोलीस कचेरीपर्यंत पोहोचत नसले तरी जी प्र्रकरणे पोलीस ठाण्यात पोहोचली व गुन्हा दाखल झाला त्यांचा तपास करताना सदर गुन्हेगार आर्थिक कोेंडीत सापडलेल्या नागरिकांकडून एटीएम किरायाने घेऊन त्याचा वापर ठगबाजीसाठी होतो.यूपीआयच्या माध्यमातून ट्रान्झेंक्शनभीम अ‍ॅपसह प्रत्येक बँकेचे मोबाईल अ‍ॅप यूपीआय (युनायटेड पेमेंट इंटरफेस) वर चालते. एमपिन सहा अंकी नंबर राहत असून तोच बहूदा ओटीपीचे काम करतो. एमपिन एखाद्यावेळी दुसºयाला दिल्यास त्याचा मोठा फटकाच नागरिकांना सहन करावा लागू शकतो. एमपिन चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास तो त्याचा वापर करून त्याच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून त्या नागरिकाची आर्थिक फसवणूक करू शकतो. यूपीआय द्वारे बँक खात्यातील रक्कम वळती करता येत असून यूपीआय चालकांसह अधिकाºयांना पैसे ब्लॉक करण्याचे अधिकार राहत नसल्याचे सांगण्यात आले. उल्न्लेखनिय म्हणजे नवीन फंड्याचा वापर करून केल्या जाणारी ठगबाजी शिवाय बँक खात्यातून पैसे काढल्या गेल्याचा मॅसेज बँक खातेदाराला सुमारे अर्धातास उशीराने मिळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.नागपुरात सहा प्रकरणेएमपिनचा फंडा वापरून ठगबाजांनी सुमारे सहा जणांना लाखों रुपयांनी गंडा घातल्याचे वर्ध्या शेजारी असलेल्या नागपूरात पुढे आले आहे. तर वर्धेतील रहिवासी असलेल्या अनिल बनारसे यांचीही फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. त्याची सुमारे १ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजी