शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

अप्पर वर्धा धरणाच्या भिंतीला तडे

By admin | Updated: November 6, 2014 23:00 IST

वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात गौणखनिज टेकड्यांना ब्लास्टिंग करून उद्ध्वस्त करण्याचा घाट चोरट्यांनी घातल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़

अमोल सोटे - आष्टी (श़)वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात गौणखनिज टेकड्यांना ब्लास्टिंग करून उद्ध्वस्त करण्याचा घाट चोरट्यांनी घातल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़ यामुळे अप्पर वर्धा धरण असुरक्षित झाले असून भिंतीला काही ठिकाणी तडे गेल्याचे दिसले़ भविष्यात डागडुजी व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्यास चांगलाच धोका होण्याची शक्यता आहे़ यास महसूल व वनविभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करताहेत़वर्धा जिल्ह्याचे शेवटचे टोक आष्टी तालुका आहे. आष्टीच्या अवघ्या १० किमी अंतरापासून अप्पर वर्धा धरणाचे शेवटचे टोक सुरू होते. शासनाच्या नियमानुसार किमान २५ किमी परिसरात ब्लास्टिंग व अवैध उत्खनन करण्यावर बंदी आहे. सदर बंदी झुगारून माफियांनी प्रशासनाला हाताशी धरून खुलेआम मुरूम, गिट्टी उत्खनन व वाहतूक सुरू केली आहे. जंगल परिसरातील वन्यप्राणी ब्लास्टिंगच्या हादऱ्याने धास्तावले आहेत़ मौजा येनाडा, पिलापूर गावाच्या १ किमी अंतरावर गिट्टी व मुरूमसाठी रस्त्यालगत एक टेकडी चांगलीच पोखरून काढली आहे़ पाणी साचल्याने वन्यप्राणी व बाजूला शेती असणारे शेतकरी, गुरांना ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे. त्याच्या ३ किमी पूढे जोलवाडी गावाजवळ मुरूमाच्या टेकड्याही खोदण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़अप्पर वर्धा धरणाचे प्रतिबंधीत क्षेत्र असुरक्षित आहे. उत्खननासोबतच गावठी दारू तयार करण्यासाठी काठावर हातभट्ट्या लावण्यात आल्या आहेत़ धरण विभागाच्या बांधलेल्या इमारती क्षतिग्रस्त झाल्या असून कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे भेटीप्रसंगी सांगण्यात आले़ यामुळे सदर इमारती अनैतिक व्यवसायांचे केंद्र बनल्याचे तेथील साहित्यावरून दिसून आले़ याठिकाणी दारूच्या पार्ट्या दिवसाढवळ्या होतात़ धरणाजवळील सुरक्षेची भिंतीला डागडुजी न झाल्याने ब्लास्टिंगच्या हादऱ्याने पूर्णत: तडा गेल्या आहेत़ धरणात १०० टक्के जलसाठा आहे. अशावेळी तात्काळ दुरूस्ती करणे आवश्यक आहे. धरणाचा मार्ग दारूविक्रेत्यांनी ठिकठिकाणी फोडून टाकला आहे. अधिकारी अर्थपूर्ण व्यवहारात व्यस्त आहेत़ सध्या रबी हंगाम सुरू झाला आहे़ शेतकरी पाण्यासाठी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून आले़