शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘युपीएचसी’ला पालिकेच्या अनास्थेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:03 IST

शहरी भागातील नागरिकांकरिता उभारण्यात आलेले वर्धेसह हिंगणघाट येथील शहरी प्राथमिक केंद्र पालिकेच्या अनास्थेचे बळी ठरत असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देबांधकामावर सव्वाकोटींचा खर्च : पुलफैलच्या इमारतीतून साहित्यही लंपास

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरी भागातील नागरिकांकरिता उभारण्यात आलेले वर्धेसह हिंगणघाट येथील शहरी प्राथमिक केंद्र पालिकेच्या अनास्थेचे बळी ठरत असल्याचे दिसून आले आहे. तब्बल सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेल्या केंद्राच्या इमारती तयार असून आरोग्य सेवा पुरविण्यात त्या कुचकामी ठरत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी भागातील नागरिकांना त्यांच्याच परिसरात आरोग्य सुविधा मिळावी म्हणून लोकसंख्येच्या आधारावर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार वर्धा शहरात पुलफैल आणि सानेवाडी या मागास भागाची निवड करण्यात आली. तर हिंगणघाट येथे दोन केंद्र देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र शहरी भागात असल्याने त्यांची सर्वस्वी जबाबदारी पालिकेवर देण्यात आली. मात्र पालिकेच्या अनागोंदीमुळे शासनाची ही योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होवून त्यांना त्यांच्याच भागात सेवा मिळण्याचा उद्देश येथे दुर्लक्षित झाल्याचे दिसते. यामुळे याकडे पालिकेने लक्ष देत शासनाचा मुख्य उद्देश पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.शासनाच्या सूचनेनुसार वर्धा व हिंगणघाट येथे प्रत्येकी दोन असे चार शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. केंद्र पालिकेच्या हद्दीत असल्याने त्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. याला चार वर्षांचा कालावधी झाला असून त्याचा कुठलाही वापर होताना दिसत नाही. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष पुरवून तशा सूचना पालिकेला देण्याची गरज आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.दोन वर्षानंतर पदभरतीप्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्यानंतर येथे लागणाºया कर्मचाºयांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. त्याची परवानगी पूर्वीच मिळाली असली तरी त्याकरिता आता मुलाखती घेण्यात येत आहे.सामान्य रुग्णालयातील ११ परिचारीका पालिकेतशहरी नागरिकांकरिता असलेल्या या युपीएचसीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील ११ परिचारीका दिल्या आहेत. वेतन पालिकेच्या माध्यमातून सुरू असून त्यांची सेवा मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे.इमारतीचा अवैध कामांकरिता वापर ?पुलफैल भागात असलेल्या इमारतीच्या पाºयांवर अस्वच्छता पसरली असून या इमारतीचा वापर अवैध कामांकरिता होत असल्याचा संशय बळावत आहे.शहरी आरोग्य केंद्रांकरिता वैद्यकीय अधिकाºयांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र सेवेत येण्यास कोणीच तयार नसल्याचे दिसून आले. या केंद्रात सेवा देण्यास कोणी तयार असल्यास त्याच्या अर्जावरच त्याची नियुक्ती करण्यात येईल. इतर कर्मचाºयांची निवड झाली आहे. अधिकारी मिळताच केंद्राची सेवा सुरू होईल.- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, नगर परिषद वर्धा.