शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:34 IST

एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिलीत.

ठळक मुद्देलालपरी धावलीच नाही : ऐन दिवाळी सणा दरम्यान प्रवाशांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिलीत. परंतु, अद्यापही मागण्यांची पूर्तता न झाल्याचा ठपका ठेवत मंगळवार १७ आॅक्टोबरपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे मंगळवारी जिल्ह्यात एकही बस धावली नाही. याचा नागरिकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर चांगलाच त्रास सहन करावा लागला.शासकीय व इतर क्षेत्रातील कर्मचाºयांपेक्षा एसटी कर्मचाºयांचे वेतन कमी असून ते अल्प वेतनात नागरिकांना सुविधा देत आहेत. त्यांना समाधानकारक वेतन देण्यात यावे. १ जुलै २०१६ पासून देय होणारा ७ टक्के वाढीव महागाई भत्ता शासकीय कर्मचाºयांना लागू करून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही रापमच्या कर्मचाºयांना तो अद्यापही लागू करण्यात आला नाही. रापमच्या कर्मचाºयांना महागाई भत्ता लागू करण्यात यावा. कामगारांच्या हिताचा असलेला वेतन करार करण्यास चालढकल होत असून तो करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.सदर संपात महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस इंटक महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटना, विदर्भ एस. टी. कामगार संघटना, संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील एकूण १ हजार ६६२ कामगार सहभागी झाल्याने वर्धा जिल्ह्यातील रापमची प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे खोळंबली होती. एकही बस मंगळवारी न धावल्याने नागरिकांना खासगी प्रवासी वाहनांचा वापर करावा लागला.बसस्थानकामध्ये स्मशान शांततामध्यरात्रीपासून रामपच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सूरू केले. या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाची एकही बस जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा बसस्थानकावर पोहोचली नाही. तर येथून सूटली नाही. ऐरवी विद्यार्थी व प्रवाशांनी गजबजून राहणाºया वर्धा बसस्थानकावर आज स्मशान शांतता होती.छोट्या व्यावसायिकांना फटकाजिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात खाद्यपदार्थ विक्री करून अनेक नागरिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु, आजच्या संप आंदोलनामुळे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाºयांसह ओटो चालकांना आर्थिक फटका सहन करावा लागला.