शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

आजनडोह येथे मनरेगाच्या कामात गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:37 PM

कारंजा तालुक्यातील आजनडोह ग्रा.पं.मध्ये मनरेगांतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे शासकीय अधिकारी सांगत असले तरी ज्या प्रमाणात कामे झाली त्याच बरोबरीने झालेल्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देसरपंच, सचिव व रोजगार सेवकांची मनमानी : कोटींच्या अपहाराची जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा तालुक्यातील आजनडोह ग्रा.पं.मध्ये मनरेगांतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे शासकीय अधिकारी सांगत असले तरी ज्या प्रमाणात कामे झाली त्याच बरोबरीने झालेल्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचे पुढे आले आहे. ही बाब काही सुजान नागरिकांनी माहिती अधिकाराचा वापर करून प्राप्त केलेल्या माहितीनंतर उजेडात आली. सुमारे कोटींच्या घरात असलेला गैरप्रकार सरपंच, ग्रा.पं. सचिव व राजगार सेवकाने संगणमत करून केल्याचा आरोप आजनडोहचे माजी सरपंच चंपत उईके यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाºयांना दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे.सुमारे १,८०० लोकसंख्या असलेले आजनडोह या ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्रात आजनडोह, ढगा व बांगडापूर ही गावे येतात. मागील काही वर्षांमध्ये या ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्रात मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, शोषखड्डे तयार करणे, विहिरीची दुरूती व तयार करणे आदी कामे करण्यात आली. गरजुंना वेळीच मजुर उपलब्ध करून दिलासा देण्यासाठी शासनाने ही योजना कार्यान्वीत करून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. परंतु, या ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्रात झालेल्या सदर कामांत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे पुरावेच माहिती अधिकाराचा वापर करून गावातील काही सुजान नागरिकांच्या हाती लागल्याचे लोकमतशी बोलताना माजी सरपंच चंपत उईके, मोहन ठाकरे, सुभाष गुप्ता, मुकिंदा धोटे, मारोती उईके, रोशन रमधम, किसनाबाई टेकाम, रामा मडावी यांनी सांगितले. या प्रकरणी जिल्हाधिकाºयांना तक्रार देण्यात आली असून चौकशी करून दोषी सरपंच, ग्रा.पं. सचिव व रोजगार सेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी रोजगार सेवक तसेच सरपंचाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.गुप्तासह टेकाम यांच्या शेतात बोगस मजूर दाखवून ५० हजारांची उचलआजणडोह ग्रा.पं.हद्दीतील रहिवासी सुभाष गुप्ता व किसनाबाई चंपत टेकाम यांच्या शेतात सरपंच, ग्रा.पं. सचिव व रोजगार सेवक यांनी संगतमत करून मनरेगा योजनेंतर्गत फळबाग लागवड उपक्रमाच्या नावाखाली बोगस मजूर दाखवून तब्बल ४९ हजार ६७० रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केल्याचे गुप्ता आणि टेकाम सांगतात. वास्तविक पाहता गुप्ता यांनी स्वखर्चातून ही कामे केल्याचे त्यांचे म्हणणे असून या गैरप्रकाराची चौकशी करून शासनाची फसवणूक करणाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांची आहे.शासनालाच लावला चुना?मनरेगाच्या फळबाग लागवड योजनेंतर्गत आजनडोह ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील रहिवासी सुभाष गुप्ता, मुकिंदा धोटे, मारोती उईके, रोशन परधम, किसनाबाई टेकाम, रामा मडावी या शेतकºयांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु, गुप्ता आणि टेकाम यांच्या शेतात झालेल्या कामावर सर्व बोगस मजूर तर उर्वरित शेतकºयांच्या शेतात मोठ्या प्रमाणात बोगस मजूर दाखवून लाखोंची उचल करण्यात आली आहे. त्याबाबतचे काही पुरावे माहिती अधिकाराचा वापर केल्यानंतर उजेडाहात असल्याचे सदर शेतकºयांचे म्हणणे आहे. खोट्या नोंदी घेवून लाखो रुपयांची उचल करून शासनालाच चूना लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.पांदण रस्त्यांच्या कामातही गडबडआजनडोह, ढगा व बांगडापूर येथे एकूण सुमारे १०० शोषखड्डे तयार करण्यात आले. लहाण व मोठ्या पांदण रस्त्याचे काम करण्यात आले. तर सुमारे १२ विहिरीची कामे करण्यात आली. परंतु, यातही सरपंच, ग्रा.पं. सचिव व रोजगार सेवकाने गैरप्रकार करून शोषखड्ड्याच्या कामात सुमारे ८५ हजार, दोन्ही पादण रस्त्यांच्या कामात दहा लाखांच्या घरात आणि विहिरींच्या कामात ३० हजार रुपये हडपल्याचे लोकमतशी बोलताना आजणडोह येथील सदर शेतकºयांनी सांगितले.मागणीनुसार कामाची निवड होते. त्यानंतर मस्टरवर नोंदी घेवून प्रत्यक्ष कामे केली जातात. आपल्याकडे आतापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई करण्यात येईल. आपल्यावरील आरोप खोटे आहेत.- एस. आर. देशमुख, सचिव, ग्रा.पं. आजनडोह.