लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग, अशी गांधीजींची संकल्पना होती. यामुळे सदर संकल्पना व महात्मा गांधी यांना अपेक्षित शिक्षण देणारे विद्यापीठ वर्धेत लवकरच उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.जुनापाणी चौक पिपरी (मेघे) ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण व मजबुतीकरण तसेच सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. डॉ. पंकज भोयर, पिपरी (मेघे)चे सरपंच अजय गौळकार, भाजपा महिला आघाडीच्या अर्चना वानखेडे, माजी जि.प. सदस्य अविनाश देव, भाजपा किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर आदींची प्रामुख्याने उपस्थित होती.ना. मुनगंटीवार पूढे म्हणाले, वर्धा शहराच्या शेजारी असलेल्या परिसराचाही विकास व्हावा या हेतूने आपल्याकडे आ. भोयर यांनी सदर रस्त्याच्या सिमेंटीकरणाची मागणी केली. या रस्त्याच्या सिमेंटीकरणासह मजबुतीकरण व सौंदर्यीकरणासाठी ३५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सरकारला साडे तीन वर्षे पूर्ण झालीत; पण अद्यापही नागरिकांचे सर्वच प्रश्न सुटले, असे म्हणता येणार नाही. काही प्रश्न सोडविताना काही अडचणी येतात. जिल्ह्यात लवकरच सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून विविध विकास कामे, बसस्थानक आदी कामे पूर्णत्वास जाणार असून जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही काम करीत असल्याचे सांगितले. यावेळी आ. भोयर यांनीही मनोगत व्यक्त केले.
वर्धेत गांधी विचारांचे शिक्षण देणारे विद्यापीठ लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:39 IST
तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग, अशी गांधीजींची संकल्पना होती. यामुळे सदर संकल्पना व महात्मा गांधी यांना अपेक्षित शिक्षण देणारे विद्यापीठ वर्धेत लवकरच उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
वर्धेत गांधी विचारांचे शिक्षण देणारे विद्यापीठ लवकरच
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जुनापाणी ते शिवाजी चौक रस्त्याचा श्रीगणेशा