शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उनी कपड्यांचा बाजार ‘थंडा’वला

By admin | Updated: October 27, 2016 00:46 IST

दिवाळी सणाच्या आगमणावर थंडीची चाहुल लागते. मात्र दोन ते तीन दिवसांपासून आकाशात ढगांचे मळभ दाटले आहे.

थंडीची प्रतीक्षा : लुधियाणा, कर्नाटकहून विक्रेते डेरेदाखलश्रेया केने  वर्धादिवाळी सणाच्या आगमणावर थंडीची चाहुल लागते. मात्र दोन ते तीन दिवसांपासून आकाशात ढगांचे मळभ दाटले आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात जाणवणारी थंडी आता ओसरल्यासारखी वाटत आहे. याचा परिणाम उनी कपड्याच्या बाजारपेठेवर दिसून येत आहे. शहरात दरवर्षी नेपाळ, तिबेटहून उनी कपड्यांचे विक्रेते येतात. यात यंदा लुधियाना आणि कर्नाटक येथील विक्रेत्यांची भर पडली आहे. विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे तर उनी कपडे खरेदी करण्यासाठी वर्धेकर थंडी पडण्याची प्रतीक्षा करीत असल्याचे जाणवते.आॅक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यंत या व्यापाऱ्यांचा येथे मुक्काम असतो. या चार महिन्यांच्या काळात लोकरीचे, उनी कपडे विकले जातात. नगर परिषद जुनी इमारत परिसरात ही दुकाने थाटली जातात. अनेक वर्षापासून हाच परिसर उनी कपड्यांचा विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. आजकाल कापड विक्रीच्या दुकानातही स्वेटर उपब्ध असतात. त्यामुळे आजकाल बरेचसे ग्राहक या बाजारात येऊन कपडे खरेदी करेलच असे दिसून येत नाही. त्यामुळे काही वर्षांपासून येथे येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळते, असे असले तरीही या उनी कपड्यांच्या बाजाराचे महत्व आजही अबाधित आहे. यात यंदा लुधियाणा आणि कर्नाटक येथील व्यापारी दाखल झाले आहे. यातही कंवाटी पद्धत पाहायला मिळते. स्थानिक बेरोजगारांच्या माध्यमातून या व्यापाऱ्यांशी उनी कपड्यांची विक्री सुरू केले आहे. या कपड्यांच्या विक्रीतून बेरोजगारांना कमीशन दिले जात असल्याची ‘लोकमत’ सोबत बोलताना दिली. उनी कपड्यांचा बाजार ‘गरम’ होण्यासाठी थंडीची प्रतीक्षा आहे.आॅनलाईन शॉपिंगचा फटकाआजकाल आॅनलाईन शॉपिंगचा ट्रेन्ड आहे. मोबाईलमुळे आॅनलाईन खरेदी करणे खुपच सुसह्य झाले आहे. यात विविध साईट्स असल्याने घरबसल्या ग्राहकांना विविध ब्रॅन्डचे आणि विविध बनावटीचे कपडे निवडीचे स्वातंत्र्य असते. यात आॅफरची भर पडत असल्याने कमी दरात चांगले कपडे निवडण्याचा पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे काही अंतर चालत जाऊन उनी कपडे खरेदी करण्याऐवजी घरबसल्या कपडे खरेदी होत असल्याने याचाही फटका या बाजाराला बसत आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळते.