शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
4
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
5
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
6
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
7
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
8
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
9
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
10
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
11
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
12
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
13
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
14
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
15
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
16
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
17
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
19
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
20
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार

रोजगाराभिमुख शिक्षणाचा अभाव हेच बेरोजगारीचे मूळ

By admin | Updated: February 21, 2016 01:35 IST

शैक्षणिक बेरोजगारांच्या समस्येने आज रौद्ररूप धारण केले आहे. एका बाजूने शिक्षित तरुणांची वाढती संख्या तर दुसऱ्या बाजूने रोजगाराचा अभाव, ....

लक्ष्मीपथी राव : दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रवर्धा : शैक्षणिक बेरोजगारांच्या समस्येने आज रौद्ररूप धारण केले आहे. एका बाजूने शिक्षित तरुणांची वाढती संख्या तर दुसऱ्या बाजूने रोजगाराचा अभाव, अशी विसंगत सामाजिक परिस्थिती देशात निर्माण झाली. शिक्षणाचे सार्वत्रीकीकरण होत आहे; पण गुणवत्ता व सुकूशलता लोप पावत चालली आहे. रोजगाराभिमुख शिक्षणाचा अभाव हेच आजच्या बेरोजगारीच्या समस्येचे मूळ होय, असे मत बंगलोरस्थित नॅक संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण विभागाचे संचालक व आयक्वॅकचे समन्वयक डॉ. लक्ष्मीपथी राव यांनी व्यक्त केले.नॅकद्वारे प्रायोजित व यशवंत महाविद्यालयाद्वारे ‘महाविद्यालयासाठी शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणाची आवश्यकता’ विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी ते बिजभाषण करीत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख तर अतिथी म्हणून एमगिरीचे संचालक डॉ. प्रफुल्ल काळे, प्राचार्य डॉ. शिरीष चिंधडे, आयक्वॅकचे समन्वयक डॉ. विलास ढोणे उपस्थित होते. डॉ. काळे यांनी उदात्त शिक्षकी पेशाला अधिक उपयुक्त बनविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविलेल्या ज्ञानाला प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन केले. डॉ. चिंधडे यांनी महा.च्या विकासात शैक्षणिक दस्तावेजांचे महत्त्व विषद करून इंग्लंड येथील शेक्सपियरच्या समाधीवर लावलेल्या त्याच्या जन्माच्या दाखल्याचा उल्लेख केला. प्राचार्य डॉ. देशमुख यांनी नॅक अंकेक्षण अहवाल कसा तयार करावा, हा उद्देश समोर ठेवून चर्चासत्राच्या विषयाची निवड करण्यात आली, असे सांगितले. यावेळी डॉ. ढोणे यांनी उच्च शिक्षणात महाविद्यालयीन नॅक अंकेक्षणाचे महत्त्व विषद केले. चर्चासत्राच्या निमित्ताने विविध महाविद्यालयातील आयक्वॅकच्या समन्वयकांनी पाठविलेल्या संशोधन निबंधांच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख, कुलगुरू डॉ. एस.पी. काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू डॉ. गिरीश्वर मिश्र यांनी पाठविलेल्या संदेश व शुभच्छापत्रांचे वाचन डॉ. ढोणे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाला बा.दे. अभियांत्रिकी महा.चे संचालक समीर देशमुख, प्राचार्य व्ही. के. पांडे, प्राचार्य बाबा घोरपडे, प्राचार्य बी.जे. हाडके, प्राचार्य डॉ. किशोर अहेर, डॉ. बैंदुर, डॉ. कल्पना जाधव उपस्थित होते. तत्पूर्वी संगीत विभागप्रमुख प्रा. अरुणा हरले यांच्या मार्गदर्शनात संगीत विभागाच्या विद्यार्थ्यानी विद्यापीठ व स्वागत गीत तसेच स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संचालन डॉ. रविशंकर मोर यांनी केले तर आभार प्रा. क्षिप्रा सिंघम यांनी मानले. विविध राज्यातील आयक्वॅकचे समन्वयक उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या चर्चासत्रात संशोधनपर निबंध सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यशाकरिता प्रा. खान, प्रा. सिदुरकर, डॉ. निंबाळकर, प्रा. भोयर, प्रा. देशमुख, डॉ. बोबडे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)गुणवत्ता विकास ही सामूहिक जबाबदारीेमहाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता विकसित करणे ही प्राचार्य व प्राध्यापकांची सामूहिक जबाबदारी आहे. प्राचार्याच्या प्रेरणेने प्राध्यापकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यगुणांचा विकास करणे शक्य आहे, असे मतही डॉ. लक्ष्मीपथी राव यांनी व्यक्त केले. शिवाय महाविद्यालयाच्या गुणवत्ता व प्रशासकीय नॅक अंकेक्षणाची गरज असल्याचे सांगितले.