शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

अनुसूचित जमातीच्या सवलती पूर्ववत द्या

By admin | Updated: January 9, 2016 02:34 IST

भोई समाजाला १९५० पासून मिळत असलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती पूर्ववत देण्यात याव्या,

भोई समाज क्रांती दलाचे आमदारांना साकडेहिंगणघाट : भोई समाजाला १९५० पासून मिळत असलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती पूर्ववत देण्यात याव्या, अशी मागणी भोई समाज क्रांती दलाच्यावतीने करण्यात आली. याबाबत आमदार समीर कुणावार यांना निवेदन देण्यात आले. भोई समाज सामाजिक संघटना गत ६४ वर्षांपासून यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ब्रिटिश शासनाने १९३६ मध्ये विविध राज्यात भोई समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या सूचीमध्ये समाविष्ट केले होते. महाराष्ट्राचाही यात समावेश आहे. तद्नंतर ५ सप्टेंबर १९५० च्या अधिसूचनेनुसार समाजाच्या सवलती काढून घेण्यात आल्या. २९ मे १९७४ रोजी राज्य शासनाने भोई समाजाला भटक्या विमुक्त जातीमध्ये टाकले. अनु. जमातीच्या सवलतींचा लाभ मिळावा म्हणून शासनाने आयोग नेमले. यात सायमन अयंगर आयोग १९४९, काका कालेरकर आयोग १९५३, डी.एन. मेहता आयोग १९६३, ठक्कर आयोग १९६५, बी.पी. मंडल आयोग १९७८, रेणके आयोग २००६ आदींचा समावेश आहे. या सर्व आयोगांनी भारतीय संविधान अनुच्छेद क्र. १५४, १६४, ३४१, ३४२ नुसार विमुक्त भटक्यांना अनु. जाती, जमातीच्या सवलती मिळाव्यात, अशी शिफारस केली; पण अद्यापही सवलती देण्यात आल्या नाहीत. महाराष्ट्र भाजपचे तत्कालीन अध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी भोई समाज क्रांतीदलाला लिखित पत्र देत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भोईसमाज क्रांतीदलाने भाजपला पांठीबाही दिला; पण भाजप सरकार समाजाचा विश्वासघात करीत असल्याचे निवेदनात नमूद करन्यात आले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बावणे, भोई समाज क्रांतीदल अध्यक्ष मोरे व समाज बांधवांनी शांतता मार्गाने आंदोलने केली; पण त्यांचा उपयोग झाला नाही. लोकप्रतिनिधींनी या रास्त मागणीकडे लक्ष देत पाठपुरावा करावा, अशी मागणी भोई समाज क्रांतीदलाने केली आहे. निवेदन देताना धर्मदास गाडवे, रमेश ढाले, अशोक मोरे, वसंत कोल्हे, प्रशांत पोहणकर, सुभाष कोल्हे, शुभम मोरे यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)