शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

समजून घ्या ‘केमिकल लोचा’

By admin | Updated: October 12, 2014 23:48 IST

मानसिक आजारामुळे समजावर तसेच रुग्णांवर होणाऱ्या परिणामाबाबत माहिती देण्यासाठी मानसिक आरोग्य सप्ताहातून आरोग्य प्रशासन विविध उपक्रम राबविते. मानसिक आरोग्याबाबत माहिती

वर्धा : मानसिक आजारामुळे समजावर तसेच रुग्णांवर होणाऱ्या परिणामाबाबत माहिती देण्यासाठी मानसिक आरोग्य सप्ताहातून आरोग्य प्रशासन विविध उपक्रम राबविते. मानसिक आरोग्याबाबत माहिती जाणून घ्या, समजून घ्या केमिकल लोचा... असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलींद सोनोने यांनी कर्मचाऱ्यांना केले. मानसिक आरोग्य जागृती सप्ताहात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मानसिक आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी तसेच या आजारापासून असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रभातफेरी काढून नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. तसेच चित्राच्या माध्यमातून या आजाराची लक्षणे व उपाय याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाल अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. धुर्वे, डॉ. इंदूरकर, डॉ. काळे, अधिसेविका पुनसे, मनोविकारतज्ञ डॉ. सोनोने आदींनी मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्य सप्ताहामध्ये तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि उपाय, मतिमंद विद्यार्थ्यांची घ्यावयाची काळजी, व्यसनधिनता आदी विषयावर विविध उपक्रमांचे आयोजन करुन जागृती करण्यात येणार आहे.जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठीही मानसिक आरोग्याबाबत जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन सुजाता पारेकर यांनी केले तर आभार कुंदा बेडकर यांनी मानले. यावेळी चारूलता कडू, गिता थूल, मिना वाहने, स्वाती रामटेके, राहुल कठाणे, मंगेकर, प्रकाश कुलसुंगे, शहा, गाठे, विधी सेवा प्राधिकरणाचे गिरीवार तसेच जिल्हा मानसिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)