पुलगाव : नागरिकांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकाभिमुख व्हावी, ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवेत अडचणी निर्माण होवू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये आणि कार्यालयामध्ये काम करणारे जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांसह सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी बायोमेट्रीकवर नोंदवून आधार कार्डशी संलग्न करूनच त्यांचे वेतन काढले जाणार आहे. तसे आदेश राज्यशासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे देण्यात आले आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांवर चांगलाच चाप ओढला जाणार आहे. सदर निर्णय शासनाद्वारे निर्गमित झाल्यापासून १५ दिवसाच्या आत बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यात या प्रणालीचे संनियंत्रण करून १५ तारखेपर्यंत कार्यवाहीचा अहवाल प्रादेशिक प्रमुखाकडे सादर करण्याच्या सूचना आहेत. राज्यातील आरोग्य सेवा क्षेत्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी उपस्थितीबाबत तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. ही बाब आणि आरोग्य संस्थांबाबत निर्माण होणारा जनतेचा रोष लक्षात घेता, या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांना बरेचदा तश्या सूचनाही केल्या. पण त्या पाळल्या जात ंबसल्याने सदर निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर रात्री वैद्यकीय अधिकारी बरेचदा उपस्थित राहत नसल्याची ओरड आहे. पण या शासन निर्णयानुसार शासकीय आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फॉर्मासिस्ट, वॉर्ड बॉय व इतर कर्मचारी यांनी प्रभावी व कार्यक्षेत्र व्यवस्थापन करून गुणक्तापूर्ण आरोग्य सेवा, सुविधा सर्व सामान्यांना मिळवून देण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली राबवावी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेतन देयके सादर करताना बायोमेट्रिक उपस्थितीची खात्री करून घ्यावी अशा सूचना आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व इतर आरोग्य संस्थातून काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी बंधनकारक राहणार आहे. यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांनाचा चांअग्लाच चाप बसणार असल्याचे दिसत आहे.(तालुका प्रतिनिधी)वाढत्या तक्रारींची दखल४राज्यातील आरोग्य सेवा क्षेत्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी उपस्थितीबाबत तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. ही बाब आणि आरोग्य संस्थांबाबत निर्माण होणारा जनतेचा रोष लक्षात घेता, या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांना बरेचदा तश्या सूचनाही केल्या. पण परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
१५ दिवसात बायोमेट्रिक प्रणालीचा अल्टीमेटम
By admin | Updated: April 12, 2016 04:34 IST