शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठरलेल्या मुहूर्तावर अतिक्रमण हटले

By admin | Updated: June 27, 2017 01:19 IST

येथील बस स्थानक परिसर आणि महामार्गालगतचे दोही बाजुचे रोड अतिक्रमणांच्या विळख्यात होते. यामुळे या मार्गावर अनेक अपघात झालेत.

पोलीस बंदोबस्त : बेरोजगाराची समस्या सोडविण्याकडेही लक्ष लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा(घा.) : येथील बस स्थानक परिसर आणि महामार्गालगतचे दोही बाजुचे रोड अतिक्रमणांच्या विळख्यात होते. यामुळे या मार्गावर अनेक अपघात झालेत. यामुळे सामान्य जनता परेशान झाली होती. अतिक्रमण काढण्याकरिता अनेकवार नोटीस बजावण्यात आली. मात्र अतिक्रमण काढण्यात आले नाही. अखेर २४ जून रोजी सकाळी १० वाजतापासून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. शहरवासियांनी अतिक्रमणामुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार कारंजा नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली, असता मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी ओरियंटल पाथवे कंपनीला अतिक्रमण हटविण्याकरिता लेखी पत्र दिले. यावर ओरिंयंटल पाथवे कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरनी जवळपास १५० अतिक्रमण धारकांना नोटीस देवून २३ जून पर्यंत अतिक्रमण हटवा, अन्यथा पोलिसबळ वापरून २४ जूनला अतिक्रमण हटविल्या जाईल अशी तंबी दिली होती. या तंबीनुसार ठाणेदार, पोलीस स्टॉप, ओरियंटलचे प्रोजेक्ट आॅफिसर अग्रवाल यांनी बुलडोझर सोबत घेवून महामार्ग क्र.६ चे दोन्ही बाजुच्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या. अनेकांनी अतिक्रमण काढले, पण काहींनी विरोध केला असता त्यांचे अतिक्रमण जबरदस्तीने हटविण्यात आले. २३ जूनला शिवसेनेच्या काही नेत्यांनी अतिक्रमण धारकांना सोबत घेवून अस्थायी स्वरुपाचे अतिक्रमण करणाऱ्यांचे ठेले किंवा झोपडी व दुकाने हटवू नये. ते हटविल्यास बेरोजगारी व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी बाजू मांडण्यासाठी ठाणेदार, नगरपंचायत सीओ व तहसीलदाराची भेट घेतली. पण अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होवून सर्वसामान्य जनतेच्या जीवन दृष्टीकोनातून अतिक्रमण हटविणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटवितांना काही अनुचित प्रकार तर घडणार नाही ना, अशी भीती, सामान्य जनतेत होती; पण अतिक्रमण हटविणारे अधिकारी आणि अतिक्रमण धारक यांच्यातील सामंजस्य पूर्ण भूमिकेमुळे अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत पार पडली.