७०.८२ टक्के मतदान : सर्कसपूर येथे मतदार यादीत घोळ आर्वी : तालुक्यातील वाठोडा व मोरांगणा या दोन जि.प. गट आणि वाठोडा, देऊरवाडा, मोरांगणा व काचनूर या चार पं.स. गणांतील एकूण २९ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. सायंकाळपर्यंत ७०.८२ मतदान झाल्याची माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली. तालुक्यातील सर्कसपूर येथील मतदार यादीत घोळ आढळून आल्याने येथील मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. येथे १०२ वर्षांच्या अलोकाबाई सहारे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. येथील मतदान केंद्रावर ५५० मतदारांनी मतदान केले. देऊरवाडा पं.स. गणात भाजपाचे प्रा. धर्मेंद्र राऊत व कॉँग्रेसचे सचीन वैद्य यांच्यात सरळ लढत होती. निंबोली (शेंडे) येथील मतदान केंद्रावर ९१५ पैकी ग्रामपंचायत मतदान केंद्रावर ६०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्रावर भाजपा उमेदवाराला आघाडी मिळण्याचे संकेत यावेळी मतदारांनी मतदान केंद्राला भेट दिली असता दिलेत. देऊरवाडा, नांदपूर येथील मतदान केंद्रावर सकाळी व दुपारी ४ वाजतानंतर मतदारांची गर्दी दिसून आली. वाठोडा येथील जि.प. गटात भाजपा-कॉँग्रेस यांच्यात काट्याची लढत आहे. मोरांगणा जि.प. गटात रजनी देशमुख व जयश्री राठी यांच्यात सरळ लढत आहे. दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसून आला.(तालुका प्रतिनिधी)
दोन जि.प. गट व चार पं.स. गणांचे मतदान शांततेत
By admin | Updated: February 22, 2017 00:51 IST