शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणी दोघांना २० वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: February 16, 2017 01:18 IST

येथील सुदामपुरी परिसरात फुल तोडण्याकरिता गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर बळजबरी करणाऱ्या दोघांना २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा : अल्पवयीन मुलीवर केली होती बळजबरी वर्धा : येथील सुदामपुरी परिसरात फुल तोडण्याकरिता गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर बळजबरी करणाऱ्या दोघांना २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विनोद बापु जाधव व सुनील राजू जाधव दोन्ही रा. वडार झोपडपट्टी अशी शिक्षा ठोवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा निकाल विशेष सत्र न्यायाधीश अंजली खडसे यांनी बुधवारी दिला. या बाबत थोडक्यात अशी की, २६ सप्टेंबर २०१४ रोती पहाटे ५ वाजताच्या सुमारास १५ वर्षीय पीडिता सायकलने सुदामपुरी परिसरात गोडे यांच्या घरामागे असलेल्या नगर परिषदेच्या मैदानात असलेल्या झाडावर फुले तोडण्याकरिता गेली होती. दरम्यान विनोद सुनील या दोघांनी तिला बळजबरीने पकडले. या दोघांच्या तावडीतून तिने पळण्याचा प्रयत्न केला; मात्र ती असफल ठरली. यावेळी दोघांनीही तिच्यावर बळजबरी केली. तीने घरी पोहोचताच झालेल्या प्रकाराची माहिती दिली. यावरून तिच्या परिवारातील सदस्यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भांदविच्या कलम ३७६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. तपासाअंती तत्कालीन ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी प्रकरण न्यायसप्रविष्ट केले. सदर प्रकरण साक्ष पुराव्याकरिता न्यायाधीश अंजली खडसे यांच्या न्यायालयात आले. या प्रकरणात एकूण आठ साक्षदार तपासण्यात आले. यात दोन्ही आरोपी दोषी असल्याचे दिसून आले. यावरून न्यायाधीशांनी विनोद जाधव व सुनील जाधव या दोघांना भादंविच्या कलम ३७६ (ड) अन्वये २० वर्षे सश्रम करावास आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडिताला देण्याचे आदेश न्यायालयाने पारीत केले आहेत. या प्रकरणात प्रारंभी काही साक्षीदार तत्कालीन सरकारी अभियोक्ता अर्चना वानखेडे यांनी तपासले तसेच उर्वरीत साक्षीदार व युक्तीवाद सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी केला. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उज्वला देवकर यांनी केला. तसेच सदर प्रकरणात साक्षीदारांना हजर करण्याची जबाबदारी सहायक पोलीस उपनिरीक्षक माळोदे व जमादार भगत यांनी सांभाळली. (प्रतिनिधी)