शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

धनादेश अनादरप्रकरणी दोन वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: March 4, 2016 02:15 IST

धनादेश अनादर प्रकरणी येथील साई ट्रेडर्सचे प्रोप्रायटर ब्रिजरतन गोविंददास मोहता यांना न्यायदंडाधिकारी यु.एन. पाटील यांनी दोन वर्षांचा सश्रम कारावास ...

मोहताची जामिनावर सुटका : दंडाच्या एक चतुर्थांश रकमेचा भरणा करण्याचा आदेशहिंगणघाट : धनादेश अनादर प्रकरणी येथील साई ट्रेडर्सचे प्रोप्रायटर ब्रिजरतन गोविंददास मोहता यांना न्यायदंडाधिकारी यु.एन. पाटील यांनी दोन वर्षांचा सश्रम कारावास व ८ लाख ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला पुन्हा सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा देत तात्काळ तुरुंगात रवानगी केली. थोडक्यात हकीगत अशी की, येथील साई ट्रेडर्सचे संचालक ब्रिजरतन गोविंददास मोहता (४८) रा. जगन्नाथ वॉर्ड यांनी विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था, हिंगणघाटकडून १ लाख २५ हजारांचे कर्ज १९९८-९९ मध्ये घेतले होते. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या पतसंस्थेला त्याने १८ आॅक्टोबर २००८ रोजी ४ लाख २५ हजारांचा विदर्भ मर्चंट अर्बन सहकारी बॅँक हिंगणघाटचा धनादेश दिला होता. तो पतसंस्थेने बॅँकेत जमा केला; पण त्यापूर्वीच त्याने बॅँकेचे खाते बंद केल्याने धनादेश अनादरीत झाला. याबाबत नोटीस पाठवूनही पतसंस्थेला धनादेशाची रक्कम मोहता याने दिली नाही. यामुळे पतसंस्थेने २००९ मध्ये त्याच्याविरूद्ध येथील फौजदारी न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणात फिर्यादीतर्फे पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल शेगोकर आणि विदर्भ मर्चंट बॅँकेचे व्यवस्थापक रितेश पिपलवा यांची साक्ष नोंदविण्यात आली तथा आरोपीच्यावतीने स्वत: ब्रिजरतन मोहता याने आपली साक्ष दिली. आरोपी मोहता याने या प्रकरणात फिर्यादी पतसंस्थेचे बनावट धनादेश तयार करून त्याच्यावर कर्ज नसतानाही खोटे प्रकरण दाखल केल्याचा बचाव घेतला होता. एवढेच नव्हे तर, त्याने फिर्यादी संस्थेच्या १३ संचालक आणि व्यवस्थापकाविरूद्ध भादंविच्या कलम १९१, १९२, १९३, १९६, १९९, २००, ४२०, ४५६, ४६८, ४६९, ४७१, ४७२, ४७३, ४७४ तसेच कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार वेगळे प्रकरणही न्यायालयात दाखल केले होते. न्यायाधीश पाटील यांनी दोन्ही पक्षांचा साक्ष, पुरावा विचारात घेऊन आणि उभय पक्षांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून आरोपी मोहता याला धनादेश अनादर प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. आरोपी मोहता याने वरील विविध कलमांतर्गत दाखल केलेले पतसंस्थेच्या संचालक आणि व्यवस्थापकाविरुद्धचे प्रकरण येथील दुसरे तदर्थ न्यायाधीश नेरकर यांनी खारीज केले. फिर्यादी पतसंस्थेच्यावतीने अ‍ॅड. एस.एन. ढगे यांनी काम पाहिले.(तालुका प्रतिनिधी)