शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून गटसचिवांना वेतन नाही

By admin | Updated: June 26, 2017 00:39 IST

जिल्ह्यातील ३४१ ग्रामीण विविध कार्यकारी सहकारी संस्थेत कार्यरत असलेल्या गटसचिवांचे वेतन दोन वर्षांपासून थकीत आहे.

उदरनिर्वाहाचा प्रश्न : तोडगा काढण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील ३४१ ग्रामीण विविध कार्यकारी सहकारी संस्थेत कार्यरत असलेल्या गटसचिवांचे वेतन दोन वर्षांपासून थकीत आहे. गटसचिव शासनाच्या आदेशान्वये कामाची नियमित पुर्तता करतात. मात्र त्यांच्या आर्थिक प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. गटसचिवांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. गटसचिवांच्या विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. शासनाच्या धोरणानुसार सेवेत असलेल्या गटसचिवांचे वेतन ते ज्या संस्थेवर कार्यरत आहेत त्या संस्थेकडून केले जाते. एकूण वेतनाच्या सव्वा पट रकमेची आकारणी करुन, तसेच संस्थेने जिल्हा देखरेख सहकारी संस्थेकडे भरलेल्या वर्गणी रकमेतून गटसचिवांचे वेतन केले जातात. शासनाचे कर्जमाफीचे नवे धोरण, कर्जाचे होणारे पुनर्गठन यामुळे कर्जाची वसूली होत नाही. त्यामुळे गटसचिवांचे वेतन थकीत आहे. दोन वर्षापासून वेतन झाले नसल्याने गटसचिवांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. या बँकेकडे जिल्हा देखरेख संस्थेची १७ लाखाची मुदतठेव आहे. सदर रक्कम येथे अडकून आहे. गटसचिवांचे अनियमित होणारे वेतन, बँकेत गुंतुन असलेली रक्कम यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेवर भरणे शक्य होत नाही. त्यामुळे गटसचिवांचे भविष्य धोक्यात आहे. संस्थेच्या ग्रॅच्युईटी फंडातही कमी रक्कम भरल्याने या फंडातही निधीची कमतरता आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अडकलेला निधी प्राप्त झाल्यास गटसचिवांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो. याकरिता कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. गटसचिवांची प्रवास देयके मंजुर झालेली नाही. वेतनही वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. गटसचिवांचा प्रश्न सोडविण्याची मागणी आहे.