शहरं
Join us  
Trending Stories
1
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
2
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
3
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
4
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
6
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
7
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?
8
शनिवारी अनंत चतुर्दशी २०२५: साडेसाती, शनि महादशा सुरू आहे? ‘हे’ उपाय तारतील अन् भरभराट होईल
9
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
10
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
11
हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!
12
लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...
13
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
14
Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!
15
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
16
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
17
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
18
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
19
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
20
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?

ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: September 4, 2015 02:08 IST

नागपूर-वर्धा मार्गावर सेलू येथून दोन किमी अंतरावर उपाशा नाल्याजवळ ट्रेलरने मोटार सायकलला धडक दिली.

वर्धा-नागपूर मार्गावरील अपघात : अन्य एका अपघातात एक जखमीसेलू : नागपूर-वर्धा मार्गावर सेलू येथून दोन किमी अंतरावर उपाशा नाल्याजवळ ट्रेलरने मोटार सायकलला धडक दिली. यात गंभीर जखमी दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवीण मधुकर नेहारे (२९) रा. पुलगाव असे मृताचे नाव आहे. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. मोटार सायकल चालक प्रवीण दुचाकी क्र. एम.एच. ३१ बी.जे. ९१०५ ने गावाकडे जात होता. दरम्यान, ट्रेलर क्र. सी.जी. ०४ जे.डी. ९८७० च्या चालकाने वाहन भरधाव चालवून दुचाकीला धडक दिली. यात प्रवीण गंभीर जखमी झाला. सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उभ्या ट्रकला कारची धडक चालक जखमीनागपूर-वर्धा मार्गावर कोटंबा फाट्यानजीक उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने धडक दिली. यात कार चालक सौरभ निरंजन शेलकर रा. आयुर्वेदिक ले-आऊट नागपूर जमखी झाला. सौरभ आपल्या कार क्र. एम.एच. ४० ए.सी. ७६४७ ने नागपूरकडे जात होता. रस्त्यात उभा असलेला ट्रेलर क्र. सी.जी. ०७ सी. ७१७३ काळोखामुळे न दिसल्याने कार त्यावर आदळली. यात कार चालक गंभीर जखमी झाला. त्याचेवर नागपूर येथे उपचार सुरू आहे.शेताच्या धुऱ्यावरून दोन कुटुंबात वाद, चार जखमीघोराड येथे पोहाणे व गोमासे या शेतकऱ्यांमध्ये धु्ऱ्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात दोन्ही कुटुंबातील चार जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी दुपारी १२.३० वाजता घडली. नामदेव श्रीराम गोमासे व तुकाराम श्रीराम गोमासे या भावंडांचे अमोल वामन पोहाणे व लोकेश वामन पोहाणे या भावंडाशी शेताच्या धुऱ्यावरून भांडण झाले. यात दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना काठ्यांनी मारहाण केली. दोन्ही गटातील शेतकरी जखमी झाले. तक्रारीवरून सर्वांवर ३२४ (३४), ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)ट्रकसह पावणे सात लाखांचा रेतीसाठा जप्तवर्धा - देवळी पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाची तपासणी करून कारवाई केली. यात ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३२ पी. ३१२५ व १.५० ब्रास रेती, असा ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई देवळी परिसरात गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी वाहन अडविताच रूपेश फटींग व संजय ताडाम या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युवकाचा आत्महत्येचा प्रयत्नगिरड - मौजा फरिदपूर येथे दुपारी १२ वाजता शेख कलीम शेख सलीम (२४) याने राहत्या घरी शेतातील विषारी औषध प्राशन केले; पण आई घरी असल्यामुळे त्याच्याकडून औषध हिसकावले. त्याला गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी व सहकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास गिरड पोलीस करीत आहेत.इमसाचा मृत्यूवर्धा - वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल रमेश इवनाते (४०) रा. कुटकी या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राप्त माहितीवरून वडनेर पोलिसांनी गुरूवारी अमस्मात मृत्यूची नोंद केली. विषारी औषध प्राशन केल्याने इसमावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.