शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लाकडाची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 22:12 IST

विकासाच्या नावाखाली सध्या अवैध वृक्षकत्तलीला उधाण आल्याचे चित्र बघावयास मिळते. याच पाश्वभूमिवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून लाकडू भरलेली दोन मालवाहू पकडली. सदर वाहनचालकांकडे लाकडाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने लाकूड व मालवाहू वाहने जप्त केली आहे. जप्त केलेला हा मुद्देमाल लाखोंच्या घरात आहे.

ठळक मुद्देवनविभागाची कारवाई : लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विकासाच्या नावाखाली सध्या अवैध वृक्षकत्तलीला उधाण आल्याचे चित्र बघावयास मिळते. याच पाश्वभूमिवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून लाकडू भरलेली दोन मालवाहू पकडली. सदर वाहनचालकांकडे लाकडाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने लाकूड व मालवाहू वाहने जप्त केली आहे. जप्त केलेला हा मुद्देमाल लाखोंच्या घरात आहे.प्राप्त माहितीनुसार, वनविभागाचे फिरते पथक गस्तीवर असताना सदर पथकातील अधिकाऱ्यांना आर्वी मार्गाने लाकडाची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे सापळा रचून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी येळाकेळी येथे एम.एच. ३० बी. २२४४ क्रमांकाचा मालवाहू अडवून पाहणी केली असता त्यात लाकुडसाठा आढळून आला. यावेळी वनविभागाच्या अधिकाºयांनी चालकाला लाकुड वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी केली असता ते नसल्याने सदर मालवाहू आणि वाहनातील लाकुड असा एकूण सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे लाकुड वर्धा येथील लिलू पटेल यांच्या मालकीच्या सुरक्षित ठिकाणी नेले जात होते, असे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी ए. एन. कोट्टेवार, एस. एस. धोडके, व्ही. एल. खेलकर यांनी केली. तर दुसरी कारवाई कानगाव मार्गावरील पात्री शिवारात करण्यात आली. तेथे काही वाहनाची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता एम.एच. १५ बी.जे. ५०४७ क्रमांकाच्या मालवाहूत मोठ्या प्रमाणात लाकुड आढळून आले. सदर वाहन चालकाला लाकुड वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता ते त्याच्याकडे नसल्याने मालवाहू व वाहनातील लाकुड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केले आहे. सदर एकूण मुद्देमाल अडीच लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांच्या मार्गदर्शनात एस. आर. परडके, जे. बी. शेख, व्ही. बी. सोनवणे यांनी केली.