शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

दोन घरातून रोखसह सोन्या-चांदीचा ऐवज लंपास

By admin | Updated: December 26, 2016 01:48 IST

मध्यरात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी वर्धा शहर परिसरातील दोन वेगवेगळ्या

पुलफैल आणि जाकीर हुसेन परिसरातील घटना वर्धा : मध्यरात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी वर्धा शहर परिसरातील दोन वेगवेगळ्या भागातील घरातून रोखसह सोन्या-चांदीचा मुद्देमाल लंपास केला. या दोन्ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्या असून पोलिसांचा तपास सुरू आहे. स्थानिक पुलफैल भागातील धनंजय दादाराव करोडे (३०) यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश मिळविला. चोरट्यांनी करोडे यांच्या घरातील लोखंडी कपाटात ठेवून असलेले ३४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच धनंजय करोडे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दुसरी घटना शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील जाकीर हुसेन कॉलनी परिसरात घडली. जाकीर हुसेन कॉलनी येथील रोशनी मिलिंद खोब्रागडे (४७) यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील आलमारीतील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, सोन्याचे २० नग मनी, दोन चांदीचे कडे, तोरड्या, सोन्याची नथ, रोख १ हजार ५०० रुपये व इतर साहित्य असा एकूण १७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची रोशनी खोब्रागडे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)