शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी दोघे अटकेत

By admin | Updated: July 13, 2017 00:49 IST

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बनावट सह्या वापरून जात, नॉनक्रिमिलीयरसारखे प्रमाणपत्र बनवून

गुन्हा दाखल : केंद्रावरील कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बनावट सह्या वापरून जात, नॉनक्रिमिलीयरसारखे प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या केंद्राचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने पितळ उघडे केले. त्या केंद्रावरील सर्व साहित्य जप्त करीत केंद्र मालक व सहकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. देवळी नगर परिषदेच्या बाजूला विनापरवाना सामूहिक सुविधा केंद्र सुरू होते. आकाश खंडाते याच्या मालकीच्या या केंद्राद्वारे दुसऱ्या ग्रामस्तरीय उद्योजकांचा परवाना वापरला जात होता. येथे एका दिवसात नागरिकांना सर्व बनावट सह्यांचे दाखले मिळत होते. मंगळवारी तहसीलदार भागवत यांच्याकडे एका प्रकरणात खोटे जात प्रमाणपत्र आले. त्यांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता खंडाते याचे नाव समोर आले. भागवत यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना माहिती दिली. यावरून त्यांनी महाआॅनलाईनचे प्रतिक उमाटे व पथकाला तपासणीसाठी पाठविले. देवळी गाठत पथकाने सायंकाळी सदर केंद्रावर धाड टाकली. यात संगणकात सुमारे २ हजार प्रमाणपत्रे होती. तपासणीत बहुतांश प्रमाणपत्रांचे बारकोड खोटे आढळले. बनावट तथा पूर्वीच्या एसडीओंच्या सह्यांचे दाखले आढळले. रात्री १०.३० पर्यंत कागदपत्रे तपासल्यावर तलाठी व पोलिसांच्या हजेरीत संगणक, कागदपत्रे जप्त करून केंद्र सील केले. खंडाते व सहकारी धर्मपाल कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेत विविध कलम तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.