‘लोकमत‘ वृत्ताची दखल : नागरिकांनी व्यक्त केले समाधानबोरधरण: दोन वर्षापूर्वी झालेल्या वादळी पावसाने हिंगणी येथील स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजेचे खांब तुटून तारा रस्त्यावर पडल्या होत्या. लोकमतच्या पाठपुराव्याने तब्बल दोन वर्षांनंतर ही वीजजोडणी करण्यात आली. वादळाने दोन वर्षांपूर्वी खांब पडल्याने पथदिवे बंद झाले होते. परिणामी अनेक तक्रारी याबाबत तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य प्रवीण तोटे यांनी केल्या होत्या. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर तुटलेले खांब व विखुरलेल्या तारा उचलण्यात आल्या होत्या. खांब उभा करण्यात आला. पण वीजजोडणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे लोकमतने ‘दोन वर्षापासून रखडलेल्या कामाकडे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. या बातमीची दखल घेत तात्काळ वीजजोडणी जोडणी करण्यात आली.(वार्ताहर)
दोन वर्षानंतर झाली तार जोडणी
By admin | Updated: December 26, 2015 02:20 IST