शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यातच उखडला सिमेंट रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:11 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंचवीस पंधरा ग्राम विकास निधीतून उंदीरगाव येथे करण्यात आलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात संबधित विभागाकडे नागरिकांनी लेखी तक्रार देवून अद्यापही दखल घेतली नाही.

ठळक मुद्देउंदीरगावातील प्रकार : निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंचवीस पंधरा ग्राम विकास निधीतून उंदीरगाव येथे करण्यात आलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात संबधित विभागाकडे नागरिकांनी लेखी तक्रार देवून अद्यापही दखल घेतली नाही. यामुभे कंत्राटदार व अधिकाऱ्यांत हातमिळवणी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.उंदीरगाव येथील प्रमोद बोरकुटे यांच्या घरापासून शांताराम बोरकुटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम गत सहा महिन्यापूर्वी करण्यात आले. यावेळी नागरिकांनी निकृष्ट दजार्चे काम होत असल्याबाबत कंत्राटदाराला सांगितले, मात्र याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष करीत काम पूर्ण केले. सदर रस्त्याचे काम पंचवीस पंधरा ग्राम विकास निधीतून तीन लाख रुपये खर्चून करण्यात आले. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी ठेवण्यात आला होता. तर या कामात दोष आढळल्यास १२ महिन्यांच्या आत दोष निवारण करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र दोन महिन्यातच या रस्त्यावर भेगा पडलेल्या आहे.रस्त्यावरचे सिमेंट उखडले असल्याने गिट्टी उघडी पडली आहे. शिवाय रस्त्याच्या कडा खचल्याने रस्त्याचे काम दजार्हीन झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. येथील रस्त्यावर कामाच्या संदर्भात लावण्यात आलेल्या फलकावर कंत्राटदाराचे नाव नसल्याने नागरिकात विविध चचेर्ला उथान आले आहे. या सिमेंट रस्त्यावरील सध्या गिट्टी उघडी पडली असून हा रस्ता सिमेंटकरण केला अथवा खडीकरण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या संदर्भात ९ एप्रिल २०१८ रोजी येथील नागरिक प्रभाकर कोवराते यांनी बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी मुख्य अभियंता यांच्याकडे तक्रार केली; मात्र यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी उंदीरगाव येथील नागरिकांनी केली आहे.