शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचनाचे दोन कोटी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:54 IST

आॅनलाईन लोकमतवर्धा : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची सुविधा झाली असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता अनुदानावर ठिबक सिंचन देण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला. शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचनाची सुविधा उलब्ध असतानाही त्यांच्याकडून याकडे पाठ केल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षात आलेल्या अनुदानापैकी आजस्थितीत दोन कोटी रुपये अद्यापही अखर्चित असल्याची माहिती कृषी ...

ठळक मुद्देआतापर्यंत अडीच कोटींचे अनुदान वाटप

आॅनलाईन लोकमतवर्धा : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची सुविधा झाली असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता अनुदानावर ठिबक सिंचन देण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला. शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचनाची सुविधा उलब्ध असतानाही त्यांच्याकडून याकडे पाठ केल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षात आलेल्या अनुदानापैकी आजस्थितीत दोन कोटी रुपये अद्यापही अखर्चित असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.या योजनेत यंदाच्या आर्थिक वर्षात ६००० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केले होते. यापैकी ३००० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचा लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत शेतकऱ्यांना येत्या दिवसात ठिबक संच मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे संच दिल्यानंतरही जिल्ह्यात सुमारे दोन कोटी रुपये शिल्लक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याउपरही जिल्ह्याच्या कृषी विभागाच्यावतीने नव्या यंत्रांकरिता आणखी रकमेची मागणी केली आहे. ती मागणीही लवकरच पूर्णत्त्वास येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्याकरिता आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धत अंमलात आणली आहे. या योजनेतही याच पद्धतीतून अर्ज मागविण्यात येत आहे. शिवाय शेतकऱ्यांनी थेट अर्ज केले तरी शासनाच्यावतीने योजनेचा लाभ दिल्या जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आलेल्या अनुदानाचा पुरेपुर लाभ घेत योजनेकरिता अर्ज करावे असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.पऱ्हाटीचा भुरका करून सेंद्रिय खताची निर्मितीयंदाच्या खरीपात बोंडअळीने शेतकऱ्यांना चांगलेच जेरीस आणले. या पºहाटीतून पुन्हा या रोगाची शक्यता असल्याने ही पऱ्हाटी जाळून टाकण्याच्या सूचना कृषी तज्ज्ञांनी केल्या आहेत. हे जरी सोपे असले तरी यांत्रिकीकरणाच्या काळात जाळण्यापेक्षा या पºहाटीचे खत करून शेताला सेंद्रिय खत देणे शक्य असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अनुदानावर मिळणाºया स्प्रेडरच्या माध्यमातून या पºहाटीचा भुरका करून तो शेतात टाकल्यास उत्तम खत निर्माण होणे शक्य असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.ट्रॅक्टर आणि स्प्रेडरकरिताही अनुदानजिल्ह्यात यांत्रिकी शेतीचा टक्का वाढावा याकरिता मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत आहे. यात ट्रॅक्टरकरिता आणि पऱ्हाटीसह इतर पिकांची भुकटी करण्याकरिता वापरण्यात येत असलेले स्प्रेडर अनुदानावर उपलब्ध करण्यात आले आहे. यात ट्रॅक्टरकरिता सर्वसाधारण शेतकऱ्यांना १ लाख आणि अल्पभुधारक महिला शेतकऱ्याला सव्वालाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.शासनाच्या विविध योजनेतून यांत्रिकी शेती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात अनुदानही देण्यात येत आहे. यात सध्या बोंडअळीमुळे पऱ्हाटी पेटविण्याचा प्रकार सुरू आहे. जर शेतकऱ्यांनी अनुदानावर स्प्रेडर घेत या पऱ्हाटीचा भुरका करून तो शेतात टाकल्यास उत्तम सेंद्रिय खत देणे शक्य आहे.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.