शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

दोन चोऱ्यांत अडीच लाखांचा ऐवज लंपास

By admin | Updated: March 29, 2017 00:50 IST

शहरात कुलूपबंद घरांना हेरून चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याचे समोर येत आहे.

टोळी सक्रिय : नागरिकांत भीतीचे वातावरण हिंगणघाट : शहरात कुलूपबंद घरांना हेरून चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याचे समोर येत आहे. शहरात दोन ठिकाणी बंद घर फोडून चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोनही चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यात अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. यातील एक घटना संत तुकडोजी वॉर्ड येथे मंगळवारी सकाळी उघड झाली तर संत ज्ञानेश्वर वॉर्डातील दुसरी घटना रविवारी रात्री उघड झाली. संत तुकडोजी वॉर्ड येथील प्रवीण हिरामन कापसे हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने घराचे कूलप तोडून घरात प्रवेश केला. त्याने घरातील आलमारीतील तीन सोनसाखळ्या, चांदीचे दोन गोफ, सोन्याच्या दोन अंगठ्या, कानातले, सोन्याची पोत, तोरड्या असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. प्रवीण कापसे हे मंगळवारी परतले असता त्याच्या घरी चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी याची तक्रार पोलिसात केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी) सोन्याच्या ऐवजासह रोख लंपास हिंगणघाट - घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने घरात शिरून सोन्या चांदीच्या ऐवजासह रोख रकमेवर हात साफ केला. यात चोरट्याने ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना संत ज्ञानेश्वर वॉर्डात उघड झाली. या प्रकरणी हर्षल दिलीप धोटे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रानुसार, दिलीप धोटे हे संपूर्ण परिवारासह गिरड येथे पारिवारीक कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून गेले होते. हिच संधी चोरट्यानी साधून चोरट्याने दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला. शयनगृहातील कपाट उघडून त्यातील ५१ हजार रुपयाचें सोन्याचे दागदागिनी व ७ हजार रुपये रोख असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. धोटे कुटुंबिय रात्री घरी परतल्यानंतर सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हर्षल दिलीप धोटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार साळवी यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)