शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शुभांगीच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:46 IST

सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील शुभांगी उईके हिचा धपकी शिवारातील रेल्वे रूळावर विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप आई-वडील व आदिवासी संघटनांनी केला.

ठळक मुद्देखासदार, आमदारांच्या हस्ते धनादेश सुपूर्द : न्याय मिळेपर्यंत सोबत असल्याची दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील शुभांगी उईके हिचा धपकी शिवारातील रेल्वे रूळावर विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप आई-वडील व आदिवासी संघटनांनी केला. या प्रकरणी तपास सुरू आहे. तत्पूर्वी गरीब कुटुंबाला मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपये मिळवून देण्यात आलेत. खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर व आ. समीर कुणावार यांच्या हस्ते सदर धनादेश बुधवारी शुभांगीच्या आई-वडिलांना सोपविण्यात आला.यावेळी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, सभापती सोनाली कलोडे, विनोद लाखे, मिलिंद भेंडे, सरस्वती मडावी, अशोक कलोडे, राजू मडावी, अरुण उरकांदे, डॉ. सुरेश धंदरे, अरविंद धंदरे, चेतन पेंदाम, दहेगावचे उपसरपंच सुरेंद्र तिवाडे, डॉ. इरशाद शेख, उमेश राऊत आदी उपस्थित होते.याप्रसंगी शुभांगीच्या आईने आपले मत व्यक्त करताना, माझा पोलीस तपासावर मुळीच विश्वास राहिलेला नाही. कोणत्याही मुलीवर असा प्रसंग भविष्यात उद्भवू नये म्हणून दोषींना गजाआड करा. याशिवाय तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. हा लढा आम्ही पैशासाठी नव्हे तर न्यायासाठी देत आहोत, असे सांगितले. सोबतच पोलिसांकडून तपास काढून घेत हे प्रकरण सीआयडीकडे सोपवून छडा लावावा. एवढीच मदत सर्वांकडून अपेक्षित आहे, असे मतही व्यक्त केले. खासदार, आमदार यांनी त्यांच्या भावना जाणून घेत सांत्वना केली. तुमच्या कुटुंबीयांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत, असेही खासदार, आमदारांनी आवर्जून सांगितले.