शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, सहा जखमी

By admin | Updated: March 15, 2017 01:42 IST

धुळवडीच्या दिवशी झालेल्या दोन अपघातांत दोघे ठार झाले तर तीघे गंभीर जखमी झाले.

वर्धा : धुळवडीच्या दिवशी झालेल्या दोन अपघातांत दोघे ठार झाले तर तीघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी झालेल्या अपघातात तीघे गंभीर जखमी झाले. सावंगी (मेघे), खरांगणा व सेलू पोलीस ठाण्यांतर्गत हे अपघात घडले. दुचाकी अपघातात मामा ठार, भाचा गंभीर वर्धा : भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यात मामा ठार झाला तर भाचा गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वर्धा-वायगाव मार्गावरील इंझापूर शिवारात घडला. विजय कामनापूरे, असे मृतकाचे तर अमित चंद्रकांत देशपांडे रा. गजानननगर वर्धा, असे जखमीचे नाव आहे. प्रापत माहितीनुसार, गजानननगर येथील अमित देशपांडे व विजय कामनापूरे हे दोघे एमएच ४० टी ४०६० क्रमांकाच्या दुचाकीने वायगावकडून वर्धेकडे येत होते. दरम्यान, इंझापूर गावाजवळ दुचाकीला समोरून येणाऱ्या एमएच ३२ एए ६४३२ क्रमांकाच्या दुचाकीने जबर धडक दिली. यात विजय कामनापूरे यांचा जागीच मृत्यू झाला तर अमित देशपांडे गंभीर जखमी झाला. नागरिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह व अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. याबाबतच्या तक्रारीवरून सावंगी (मेघे) पोलिसांनी आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी) दुचाकी घसरल्याने एक ठार, दोघे जखमी आकोली- धुळवडीच्या दिवशी पारधी बेड्यावर मद्यपान करून भरधाव गावाकडे परत जाताना दुचाकी अनियंत्रित होऊन घसरली. यात एक जण जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाले. ही घटना आकोली-आंजी (मोठी) मार्गावर ५.१५ वाजता घडली. तिघेही पेठ या गावचे आहे. गावात दारूबंदी असल्याने पेठ येथील विजय गोपाल हिवरे (५०), मंगेश अशोक भालेराव (३०) व राजेश रामभाऊ सरोदे (२९) हे दुचाकी क्र. एमपी २८ सी ०२१८ या दुचाकीने जामणी पारधी बेड्यावर दारू पिण्याकरिता आले होते. बेड्यावर यथेच्छ मद्यपान करून गावी निघाले. दरम्यान, भरधाव दुचाकी अभियंत्रित झाली व दूरपर्यंत घासत गेली. यात विजय हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. माहिती मिळताच ठाणेदार प्रशांत पांडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद राऊत यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.(वार्ताहर)