शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

अत्याचाराच्या दोन घटनांनी समाजमन सुन्न

By admin | Updated: May 25, 2017 00:58 IST

भारसवाडा येथील अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अत्याचार केला तर शिकवणीमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनीचे खुद्द शिक्षकानेच दोन वर्षे लैंगिक शोषण केले.

तालुक्यात खळबळ : विद्यार्थिनीचे शोषणप्रकरणी शिक्षकाला अटकलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : भारसवाडा येथील अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अत्याचार केला तर शिकवणीमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनीचे खुद्द शिक्षकानेच दोन वर्षे लैंगिक शोषण केले. बलात्काराच्या या दोन्ही घटनांबाबत बुधवारी तक्रारी झाल्याने तालुक्यात खळबळ माजली. या अत्याचाराच्या घटनांमुळे समाजमन सुन्न झाले.शहरातील मध्यवस्तीत शिवस्मृती कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या शिक्षकाने एका विद्यार्थिनीचे दोन वर्षांपासून लैंगिक शोषण केले. याप्रकरणी बुधवारी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक शरद बबुलकर (४२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पिडीत विद्यार्थिनींची संख्या वाढणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिलेत. पोलीस सुत्रानुसार, शरद बबुलकर याने प्रभाग क्र. ५ मध्ये पाठे यांच्या घरी भाड्याने खोली घेत शिकवणी वर्ग सुरू केले. या ठिकाणी दोन वर्षांपासून बारावीमधील एका विद्यार्थिनीवर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण करण्याचे काम नराधम शिक्षकाने केले. इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यावर अकरावी व बारावी या दोन्ही वर्षात सदर विद्यार्थिनीचे विविध आमिषे देत शोषण केले. हे कृत्य करताना शिकवणी खोलीच्या बाहेर एक मित्र उभा करून ठेवत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्रास असह्य झाल्याने बुधवारी पिडीतेने ठाणेदाराकडे तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी आरोपी शरद बबुलकर याच्यावर भादंविच्या कलम ३७६, (२) एफ.एन. ५०६, ११४ सतत लैंगिक शोषण, जीवे मारण्याची धमकी अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सखोल माहिती तपासादरम्यान घेणे सुरू आहे. प्रकरणाचार पूढील तपास ठाणेदार दिलीप ठाकूर करीत आहेत.अल्पवयीन मुलीवर बलात्कारभारसवाडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आष्टी येथे रूम करून शिकायला आहे. आरोपीने तेथे जाऊन तुझ्या वडिलांची प्रकृती खराब आहे, असे सांगत भेटायला चल म्हणून सोबत घेऊन जात जंगलात जबरी बलात्कार केला. याबाबत मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत काळे (३२) रा. भारसवाडा, असे आरोपीचे नाव आहे.पोलीस सुत्रानुसार, अल्पवयीन पिडीता आजीसोबत आष्टी येथे शिक्षणासाठी रूम करून राहते. सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास प्रशांत काळे हा भारसवाडा येथून आष्टीला आला. रूमवर जाऊन तुझ्या वडिलांची तब्बेत ठिक नाही, असे सांगितले. भेटासाठी घेऊन यायला सांगितल्याचे म्हणत दुचाकीवर बसवून वरूड रोडने जंगलात नेले. रस्ता चुकला म्हणून तरूणीने हटकले असता आरोपीने दमदाटी केली. यानंतर जंगलात गाडी नेऊन मुलीवर जबरीने अत्याचार केला. नंतर तिला रूमवर आणून सोडले. घाबरलेल्या मुलीने रूमवर येताच सर्व प्रकार आजीला सांगितला. याबाबतच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६, सहकलम ४ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला. फरार आरोपीच्या अटकेसाठी पथक पाठविले आहे.