शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आगीच्या दोन घटना

By admin | Updated: April 23, 2017 02:08 IST

गुरुवाडी परिसराच्या मागील शेताकडून अकस्मात दुपारला आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले होते.

सेलूत दोन घरे भस्मसात : सेवाग्राम येथे बकरी व कोंबड्या भक्ष्यस्थानी सेवाग्राम : गुरुवाडी परिसराच्या मागील शेताकडून अकस्मात दुपारला आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून आणि वर्धा न.प.च्या अग्निशामक दलाने आग विझविली. यात घर, गोठा, कुटार, खत आणि काही प्राणी जळाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. आगीची माहिती मिळताच जिल्हा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. माहिती मिळताच आ. रणजित कांबळे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. ते आग लागली त्या काळापासून आग आटोक्यात येईपर्यंत घटनास्थळीच हजर होते. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला असून शासकीय मदतीची मागणी आहे. गुरुवारी परिसरातील दिलीप साठोणकर घराची सफेदी करीत होते. त्यांना अचानक आगीचा भडका दिसला. यामुळे त्यांनी घटनास्थळाकडे आरडा ओरड करीत धाव घेतली. पाहणी केली असता शेर खॉ पठाण यांच्या घराला आग लागल्याचे दिसले. यावेळी घरात शहनाज शेख (४०) ही महिला झोपलेली होती. तिला उठविण्यात आले. तोपर्यंत घराचे शेड जळून खाक झाले. अजीज शेख (४५) यांचा जनावरांचा गोठा, कुटार, खत आगीच्या भक्षस्थानी आले. त्यांची एक गाय जखमी झाली. शेर खॉ पठाण यांची बकरी, कोंबड्या जळाल्या. घराच्या शेड मधील कपडे व इतर साहित्य जळाले, निळकंठ थोटे यांच्या घराच्या स्लॅबवर कुटार, तुराट्या ठेवून होत्या. एका ठिणगीने कुटार जळायला लागल्याने युवकांनी पाण्याचा मारा करून ते विझविले. धनराज समर्थ यांच्या घरावरील पोत्यांनीही पेट घेतला होता. गुरुवाडी परीसर गावाचा शेवटचा भाग आहे. मोकळा परिसर व झाडे, वाळलेले गवत आहे. शेतातून गेलेल्या वीज तारांमुळे आग लागल्याची चर्चा आहे. नागरिकांनी घरातील सिलिंडर मुख्य मार्गावर व लांब नेवून ठेवले होते. गुरुवाडी पेटले की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. अग्निशामक दलाने नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. तहसीलदार मनोहर चव्हाण, ठाणेदार भानुदास पिदुरकर, दिलीप किटे, सरपंच रोशना जामलेकर, आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव, सुनील कोल्हे, तलाठी सदानंद जटाळे आदींनी पाहणी केली.(वार्ताहर)