शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By admin | Updated: October 11, 2014 02:01 IST

शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

तळेगाव (श्यामजीपंत), आकोली : शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यातील एक घटना तळेगाव (श्या.पं.) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळगाव तर दुसरी घटना सेलू पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या तामसवाडा शिवारात घडली. नरेश किसन बोरवार (२७) रा. कोपरा पुनर्वसन आणि पुरूषोत्तम गोपाल कोरडे (४२) अशी मृतकांची नावे आहेत. जळगाव शिवारात झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू लपविण्याकरिता शेतमालकाने त्याचा मृतदेह एका प्लासिटकच्या थैलीत ठेवल्याने हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जळगाव शिवारात नरेश बोरवार हा हरिराम निमनकर यांच्या शेताच्या धुऱ्याने जात होता. यावेळी निमनकर यांच्या पऱ्हाटीच्या शेतात शेतमजूर रामचंद्र आतराम रा. नांदोरा पुनर्वसन याने तारांच्या कुंपणाला विजेचा प्रवाह सुरू ठेवला होता. या तारांना नरेश बोरवारचा स्पर्श होताच त्याला विजेचा जोरदार झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्लास्टिकच्या थैलीमध्ये प्रेत टाकून ठेवण्यात आले. सदर घटनेची माहिती पोलीस पाटलांना मिळताच त्याने तळेगाव पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत प्रकरणाचा पंचनामा केला. सदर घटनेचा तपास सुरू आहे.दुसऱ्या घटनेत पुरूषोत्तम गोपाल कोरडे (४२) रा. चांदणी (बोथली) ता. आर्वी, हल्ली मुक्काम तामसवाडा याने दत्तूजी कौरती यांचे शेत मक्त्याने केले होते. शेतात विजेच्या खांबावर लोखंडी तारांच्या साहाय्याने त्याने लाईट लावले होते. सकाळीच तो स्प्रिंकलरचे पाईप बदलविण्यासाठी गेला होता. दुपारपर्यंत घरी न आल्याने शेतात जाऊन बघितले असता, तो मृतावस्थेत आढळला. वीज प्रवाहित लोखंडी ताराला त्याचा स्पर्श होऊन तो जागीच ठार झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ठाणेदार संतोष बाकल यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा तपास सुरू आहे. (वार्ताहर)