शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत आरटीओची कमाई ९७ लाख

By admin | Updated: April 7, 2017 02:04 IST

न्यायालयाने बीएस इंजिनच्या गाड्यांची विक्रीबंद करण्याचा निर्णय घेताच विविध कंपनीच्यावतीने मोठ मोठ्या आॅफर देत वाहनांची विक्री केली.

बीएस ३ इंजिनबंदी : ८८७ वाहनांची नोंदणी; रात्री उशिरापर्यंत केले कर्मचाऱ्यांनी कामरूपेश खैरी  वर्धा न्यायालयाने बीएस इंजिनच्या गाड्यांची विक्रीबंद करण्याचा निर्णय घेताच विविध कंपनीच्यावतीने मोठ मोठ्या आॅफर देत वाहनांची विक्री केली. या आॅफरमधून वर्धेत तब्बल ८८७ वाहनांची विक्री झाली तर नोंदणी शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाचीही बक्कळ कमाई झाली. निर्णयाच्या दोन दिवसात वाहनांच्या नोंदणी शुल्कातून विभागाला तब्बल ९७ लाख ३ हजार ७७९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दोन दिवसातील ही रक्कम आरटीओ कार्यालयाच्या रोजच्या सरासरी महसूलाच्या सातपट असल्याचे विभागाच्या रोजच्या महसूलावरून दिसत आहे. प्रदूषणाच्या कारणाने न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेल्या दोनचाकी आणि चारचाकी नव्या वाहनांची विक्रीबंदी जाहीर केली. न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच विविध कंपनींकडून दुचाकीसह चारचाकी वाहनांवर मोठ मोठ्या आॅफर जाहीर केल्या. यात चारचाकी वाहनांचाही समावेश होता. आॅफर मिळताच नागरिकांनीही दुचाकी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला. बंदीच्या दोन दिवसांपैकी ३० मार्चला वर्धेत २७९ दुचाकी वाहनांची नोंदणी झाली. या एका दिवसात १३ लाख ५१ लाख ७०० रुपये तर ३१ मार्च रोजी ६०८ वाहनांची नोंदणी झाली. या दिवशी उप प्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल ८३ ला ५१ हजार ९८९ रुपयांचा महसूल मिळाला आहे. बंदी जाहीर होताच नागरिकांकडून वाहन खरेदीचा सपाटा सुरू केला. वाहनाच्या नोंदणीकरिता एकच दिवस असल्याने नागरिकांच्या वाहनांची नोंदणी करण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागही सरसावला. या दिवसात कधी नव्हे तो उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम केला. त्यांनीही रात्री उशिरापर्यंत एकाच दिवशी खरेदी झालेल्या वाहनांची नोंद केली. या दोन दिवसात उप प्रादेशिक परिवहन विभागाचे काही अधिकारी ठराविक शोरूमध्ये ठिय्या मांडून असल्याची चर्चा वर्धेत आहे. यामुळे विभागाच्या कमाईसह काही अधिकाऱ्यांचीही कमाई यात झाल्याची चर्चाही जोरात आहे.सरासरी उत्पन्नाच्या सातपट कमाई वर्धेच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे महिन्याचे सरासरी उत्पन्न ३ कोटी रुपये असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात विभागात महिन्याच्या ३० दिवसांपैकी एकूण २२ दिवस होते. यात एका दिवसाची सरासरी कमाईचा विचार केल्यास १३ लाख ६३ हजार ६३६ रुपये होते. तर या दोन दिवसात विभागाची तब्बल ९७ लाख ३ हजार ७७९ रुपयांचा महसूल जप्त केला. हा महसूल रोजच्या महसूलाच्या तब्बल सातपट आहे. यामुळे उप प्रादेशिक परिवहन विभागाचे यंदाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नोंदणीकरिता आरटीओही उदार कधी एका दिवसात सणाचे दिवस वगळता सरासरी ५० ते ६० गाड्यांची नोंदणी करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचेही कर्मचारीही या दोन दिवसात बरेच उदार झाल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबत त्यांनी जेवढ्या गाड्यांची विक्री झाली तेवढ्याही गाड्यांची कुठलीही टाळाटाळ न करता नोंदणी करून घेतली. यामुळे वर्धेतील आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्यदक्षतेची सर्वत्र चर्चा होत आहे.