शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

२९८ सरपंचपदासाठी चार दिवसांत अडीच हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:23 IST

जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून सध्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी आवेदन स्वीकारले जात आहेत.

ठळक मुद्देसदस्यपदांसाठी ९,२०० इच्छुक : आज अखेरचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून सध्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी आवेदन स्वीकारले जात आहेत. शुक्रवारी, ८ मार्चला दुपारी २ वाजेपर्यंत सरपंचपदासाठी २ हजार ४२२ तर ग्रा.पं. सदस्य पदासाठी ९ हजार २०० इच्छुकांनी आपले आवेदन आॅनलाईन पद्धतीने सादर केल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी गुरूवार ७ मार्चपर्यंत सरपंचपदासाठी इच्छुकांचे २१६ तर ग्रा.पं. सदस्यपदासाठी ६१० उमेदवारांचे अर्ज ग्राह्य मानण्यात आले आहेत.वर्धा जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून त्यासाठी आदर्श निवडणूक आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू आहे. जिल्ह्यातील या ग्रा. पं. तील एकूण ९४९ प्रभागातील लोकप्रतिनिधी सदर निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदार निवडून देणार आहेत. सरपंचाची निवड थेट मतदार करणार आहेत. तसेच ही निवडणूक संपताच लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक राहणार असल्याने ग्रामीण भागातील ही निवडणूक विविध राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचीच असल्याचे मानले जात आहे. सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा शनिवार ९ मार्च अखेरचा दिवस असून किती अर्ज येतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.लोकप्रतिनिधींच्या वाहनांची चाके थांबली५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा असून येथे ग्रा.पं. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. यामुळे जि.प., पं. स. न. प. तील लोकप्रतिनिधींना शासकीय वाहने कुठे न्यावी आणि कुठे नेऊ नये, असे निर्बंध घालण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काळात या लोकप्रतिनिधींच्या शासकीय वाहनाचा प्रवास केवळ शासकीय कार्यालय ते निवासस्थान असाच असणे क्रमप्राप्त आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास फौजदारी व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.आॅनलाईन आवेदनानंतरही सादर करावा लागतो आॅफलाईन अर्जनिवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना सुविधा व्हावी या हेतूने आॅनलाईन आवेदन स्वीकारले जात आहेत. असे असले तरी उमेदवाराने आॅनलाईन आवेदन सादर केल्यानंतरही सदर अर्जाची प्रिंटआऊट तालुका कचेरीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक