शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

दोन दिवसांत साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:11 IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत दारूबंदी पोलीस पथकाने सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत वाहनासह एकूण साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर हिंगणघाट पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत दारूबंदी पोलीस पथकाने सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत वाहनासह एकूण साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भाक्रा नाला नंदोरी मार्गावर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान कार क्रमांक एमएच ०२ बी. टी. ०१६२ मधून देशी दारूच्या बाटल्या असलेल्या ४० पेट्या जप्त केल्या. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. जप्त दारूसाठ्यासह मुद्देमालाची किंमत ४ लाख ९२ हजार रुपये आहे. याप्रकरणी सादिक फरीद शेख (२२) रा. तरोडा, पंकज दीपक काळे रा. फुले वॉर्ड या दोघांना अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत हिंगणघाट तालुक्यातील शेगाव (कुंड) येथील काळे यांच्या शेतातील बंड्यामधून विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. हा दारूसाठा ऋषभ सुशील काळे रा. फुले वॉर्ड याचा असल्याची माहिती माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी बंड्यामधून रॉयल स्टॅगच्या १४४ बाटल्या, डिप्लोमॅट कंपनीच्या १२० बाटल्या, ओसी ब्ल्यू कंपनीच्या ९६ बाटल्या, आयबी कंपनीच्या १२० मॅकडॉ, नं. ड च्या ९६ असा हकून १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाईत एकूण ३ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जी. एस. टेळे, हिंगणघाटचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात दारूबंदी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे, राजेंद्र हाडके, रामकिसन इप्पर, अभय वानखेडे, वीरेंद्र कांबळे, समीर गावंडे, सतीश नंदागवळी, रामदास चकोले, सचिन घेवंदे, गजानन जाचक आदींनी केली. सध्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. याकरिताच इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा आणण्यात आल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी