गुदमरून मृत्यूचा संशय : घटनास्थळी पंचनामाआकोली : मासोद ते महाकाळी घाटात अज्ञात वाहन चालकाने बारा मृत गोऱ्हे आणून टाकले. माहिती खरांगणा पोलिसांना मिळताच ठाणेदार प्रशांत पांडे, जमादार संजय पंचभाई, देवराव येणकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.मासोद ते महाकाळी दरम्यानच्या घाटात बारा गोऱ्हे (वळू) ये-जा करणाऱ्यांना मृतावस्थेत आढळले. ट्रकमध्ये जनावरे कोंबून नेत असल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी सदर जंगलातून जाणारा मार्ग निर्मनुष्य असतो. ही संधी साधून मृत गोऱ्हे बेवारस टाकले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खरांगणा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. चार डॉक्टरांची चमू शवविच्छेदन करीत आहे. मृत जनावरांच्या दफनविधीकरीता मासोद व काचनूर ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करीत आहे.(वार्ताहर)
महाकाळी-मासोद घाटात बारा मृत गोऱ्हे आणून टाकले
By admin | Updated: August 25, 2016 00:39 IST