शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बारावीत 59 विद्यार्थ्यांमुळे निकालाचे शतक हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून ७ हजार ३८१ मुलं आणि ७३३० मुली असे एकूण १४ हजार ७११ विद्यार्थी बारावीत प्रवेशित होते. यापैकीत ७ हजार ३५० मुलं आणि ७ हजार ३०२ मुली असे एकूण १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची टक्केवारी ९९.५९ राहिली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९९.५९ टक्के : परीक्षेविना विद्यार्थ्यांची नेत्रदीपक प्रगती, कोविडमुळे यंदा ऑनलाईन घेतले शिक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या महामारीमुळे परीक्षेविनाही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. दहावीच्या पाठोपाठ आता बारावीच्या निकालातही विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील १४ हजार ७११ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. केवळ ५९ विद्यार्थी याही काळात अनुत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याच्या निकालाचे शतक हुकले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून ७ हजार ३८१ मुलं आणि ७३३० मुली असे एकूण १४ हजार ७११ विद्यार्थी बारावीत प्रवेशित होते. यापैकीत ७ हजार ३५० मुलं आणि ७ हजार ३०२ मुली असे एकूण १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची टक्केवारी ९९.५९ राहिली आहे. गेल्या वर्षी परीक्षा न झाल्याने यावर्षी तरी परीक्षा व्हावी, अशी विद्यार्थ्यांसह पालकांची ईच्छ होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालामुळे उत्तीर्ण होण्याच्या उत्साहावर काहीसे विरजन पडल्याचे चित्र दिसून आले.

निकालाची मूल्यमापन कार्यपद्धती- कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २०२१ साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची बारावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. २ जुलैच्या शासन निर्णयानुसार मुलांची विषयनिहाय संपादणूक कनिष्ठ महा.मार्फत निश्चित करण्यात आली. विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी शासन निर्णयानुसार निकाल समितीचे गठन करुन त्यांना विषय शिक्षक व वर्ग शिक्षकांनी केलेल्या मूल्यमापनाचे परीक्षण व नियमन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. निकाल समितीचे अंतिम केलेले गुण सीलबंद पाकीटात विभागीय मंडळाकडे जमा करण्यात आले. निकालासाठी दहावी व अकरावीच्या अंतिम गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत विभागीय मंडळाकडे जमा केली.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल