शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगाराकडे वळून बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा

By admin | Updated: August 9, 2014 23:53 IST

सद्यस्थितीत युवकांना भेडसावत असलेल्या बेरोजगारीच्या समस्येवर युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळून आपला बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी लागणारे कौशल्य विकसित करून,

वर्धा : सद्यस्थितीत युवकांना भेडसावत असलेल्या बेरोजगारीच्या समस्येवर युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळून आपला बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी लागणारे कौशल्य विकसित करून, आत्मविश्वास जागृत करून त्याला परिश्रमाची जोड देवून, आपले व्यक्तिमत्त्व विकसित करावे लागेल, असे मत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था निदेशक नरेंद्र काळे यांनी व्यक्त केले. नेहरू युवा केंद्र व स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र, वर्धा द्वारे न्यु आर्टस कॉलेज, वर्धा परिसरात असलेल्या स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, वर्धा येथे युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निवासी शिबिरात वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्याील ४० युवक-युवती सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक निशिकांत घैसास उपस्थित होते. आपल्या परिस्थितीवर, समस्येवर रडत बसण्यापेक्षा त्याविरूद्ध हिम्मत ठेवून संघर्ष करा. त्यावर नक्कीच मात करण्यात यशस्वी व्हाल असे ते यावेळी म्हणाले. प्रास्ताविकात नेहरू युवा केंद्र, वर्धा च्या जिल्हा युवा समन्वयक ज्योती मोहिते यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली. युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे फुलशेती प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून सुरूवातीला उद्योजकतेची मानसिकता विकसित करण्यासाठी युवकांना जीवन कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य आदी बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवस निवासी प्रशिक्षण ग्रामीण युवकांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखपाल धरमलाल धुवारे, मंगेश डुबे,यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)