शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दशकापासून जलशुद्धिकरण केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:02 IST

नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देकोट्यवधीचा खर्च पाण्यात : नागरिकांना अशुद्धच पाणी

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी): नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे.राज्यपाल तथा वर्धेच्या खासदार राहिलेल्या दिवंगत प्रभाताई राव यांच्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करून गावांत जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले. याकरिता वर्धा नदीवरुन पाईपलाईन टाकण्यात आली. नागरिकांकरिता लाभाची असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आज कुचकामी ठरत आहे. योजना राबविण्याच्या निर्णयाला १५ वर्षे झाली. यात दहा वर्षांपासून ती केवळ शोभेची ठरत आहे.या योजनेचा लाभ गावकऱ्यांना व्हावा याकरिता वर्धा नदीवरुन थेट पाइपलाईन टाकुन गावात पाणी आले. पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता जलशुध्दीकरण केंद्र उभे झाले. परंतु गत दहा वर्षांपासून वर्धा नदीवरुन टाकलेली पाईपलाईन व जलशुध्दीकरण केंद्र बंदच असल्याने नागरिकांना त्याचा कुठलाही लाभ होत नाही. गावकºयांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत असून अप्रमाणीत पाण्याने तहाण भागवावी लागत आहे.इमारतीला तडे आणि यंत्रही झाले जीर्णविरूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या इतमारतीला तडे गेले असून यात्रील यंत्रही आता जुने झाले आहे. यामुळे ते कुचकामी ठरणार आहे. यावर निधी खर्च करणे शक्य नसून गावांत नवे केंद्र लावण्यात यावे अशी मागणी होत आहे.वीज देयकही थकलेया जलशुद्धीकरण केंद्राचे देयक थकल्याने वीज पुरवठ्याचे देयक थकीत आहे. यामुळे पाणी पुरवठा योजना आणि जलशुद्धीकरण योजना बंद आहे. याकरिता ग्रामपंचातीने पुढाकार घेत या दोन्ही योजना सुरु केल्या तर विरूळचा पाणी प्रश्न कायमचा मिटेल. गावात भीषण पाणीटंचाई असून सध्या तब्बल १० दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची पाण्याकरिता पायपीट होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गत दहा वर्षांपासून जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्यामुळे यातील मशनरीज पूर्णपणे खराब झाल्या. जलशुद्धी केंद्राच्या इमारतीला तडे गेल्या असल्यामुळे इमारत जीर्ण झाली आहे. विद्युत बील सुध्दा थकीत असल्यामुळे हे केंद्र सुरू करता येणार नाही. याबाबत नवीन जलशुद्धी केंद्राची मागणी शासनाकडे करणार आहे.- साधना उईके, सरपंच, विरूळ.