शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचे थ्री-फेज भारनियमन बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:01 IST

मागील बारा दिवसांपासून रात्रीच्या वेळी थ्री -फेज भारनियमन सुरू आहे. यामुळे पिकांना ओलित करणे बंद झाले आहे.

ठळक मुद्देमागील बारा दिवसांपासून रात्रीच्या वेळी थ्री -फेज भारनियमन सुरू आहे

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : मागील बारा दिवसांपासून रात्रीच्या वेळी थ्री -फेज भारनियमन सुरू आहे. यामुळे पिकांना ओलित करणे बंद झाले आहे. पुर्वीचे वेळापत्रक कायम ठेवा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शेतकºयांनी मंगळवारी वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यासह तहसीलदार तथा ठाणेदारांना दिला आहे.बारा दिवसांपासून थ्री-फेज भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हे वेळापत्रक पाहता आठवड्यातील चार दिवस शेतकºयांनी पिकांचे सिंचन करूच नये, असाच संदेश दिला जात असल्याचे दिसते. हा प्रकार अन्यायकारक आहे. याचा शेतकरी स्वीकार करू शकत नाही. पूर्वी सोमवार ते गुरूवारी रात्रीचा वीज पुरवठा ११.४५ ते सकाळी ९.४५, असा होता. यामुळे किमान ३ तास ओलित करता येत होते; पण नव्याने दिलेल्या वेळापत्रकात रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत भारनियमन केल्याने चार दिवस ओलित करणे शक्य नाही. पहाटेच्या वेळी शेतकरी शेतात जाऊ शकत नाहीत. यामुळे शेतकºयांनी चार दिवस ओलित करू नये, असा दुष्ट हेतू असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. सध्या उन्हाची तिव्रता वाढत असल्याने कपाशीला पाणी देणे गरजेचे आहे. रबी हंगाम सुरू झाल्याने हरभरा पिकासाठी ओलिताची गरज आहे. आधीच शेतमालाचे भाव कवडीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. रबी हंगामासाठी दिलेले वेळापत्रक अन्यायकारक असून ते मागे घ्यावे. सात तासाऐवजी चार तास वीज द्यावी; पण दिवसा द्यावी वा पुर्वीचे वेळापत्रक कायम ठेवावे, अशी मागणी केली. निवेदनाची दखल न घेतल्यास १ नोव्हेंबर रोजी येथील वीज कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी अशोक विजयकर, वासुदेव कपले, दिलीप पोकळे, शेषराव राणे, फजल खान, दिलीप राणे, दीपक बोंडे, सुनील देशमुख, अशोक शिरभाते, प्रशांत सिसट, कैलास आढे, विलास बानाईत, अफाज खान, जगदीश कनेर, यशवंत पोकळे, शेर खा पठाण, इखार आदी उपस्थित होते.