शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

वळण रस्ता झाला धोक्याचा

By admin | Updated: November 13, 2016 00:53 IST

नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी जडवाहतूक शहराबाहेरुन काढण्यासाठी वळणरस्ता तयार करण्यात आला.

दुरुस्तीचे वावडे : खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळणीवर्धा : नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी जडवाहतूक शहराबाहेरुन काढण्यासाठी वळणरस्ता तयार करण्यात आला. अवजड वाहनांना थेट शहरातून प्रवेश न देता पवनार-वर्धा मार्गावरील दत्तपूर परिसरातून बायपास काढून वाहतूक वळती केली. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी झाला. जडवाहनांसह शहरातील वाहनधारकांकडून या रस्त्याचा उपयोग केला जातो. सध्या या मार्गावर वर्दळ वाढली आहे. मात्र या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली असून ही बाब अपघाताचे कारण ठरत आहे.पूर्वी नागपूरवरून येणारी जडवाहने शहरातील मुख्य मार्गाने जात होती. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. ही अडचण दूर करण्यासाठी दत्तपूर परिसरातून बायपास मार्ग तयार करण्यात आला. या मार्गाने नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी जडवाहने वळती करण्यात आली. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा भार कमी झाला. सध्या या मार्गावरून दररोज शेकडो जडवाहने धावतात. यासह रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरी वसाहतीतील वाहतूक येथूनच होते. दुचाकी व कार यासारख्या वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. मात्र त्याची डागडुजी केली नाही. त्यामुळे रस्त्याची अत्यंत दैना झाली आहे. वळणरस्ता असल्याने वाहने भरधाव धावतात. अशात जडवाहनांचे चालक खड्ड्यांचा विचार करीत नाही. अनेकदा वाहनाचे टायर पंक्चर होतात. दुचाकी, कार या वाहनांचे चालक खड्ड्यांना चुकविण्याचा प्रयत्नात अपघात होतात.या खड्ड्यांमुळे या मार्गाने रात्रीची होणारी वाहतूक धोकादायक झाली आहे. जडवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही या मार्गाने होते. अशावेळी या खड्ड्यांंमुळे प्रवाशांना यातनामय प्रवास करावा लागतो. प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांची दैना होते. याबाबत अनेकदा आंदोलने झालीत. रस्त्यावर बेशरमाची झाडेही लावण्यात आली होती. याउपरही संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही.(स्थानिक प्रतिनिधी) रस्त्याच्या कडा खचल्याने वाहनांमध्ये होतो बिघाडया वळणरस्त्याचा वापर शहरातील मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमातील उरलेले अन्न टाकण्यासाठी केला जातो. तसेच येथे कचरा टाकण्यात येतो. काही सामाजिक संघटनांनी येथे सफाई मोहीम राबविली. येथे कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आल्यानंतर हा प्रकार सुरू आहे. हे शिळे अन्न खाण्यासाठी कुत्रे, गाय, म्हशी आदी जनावरे येथे भटकत असतात. अशावेळी एखादे भरधाव वाहन आल्यास नाहक ही जनावरे वाहनाखाली चिरडली जातात. परिसरात जनावरे सडल्याने दुर्गंधी पसरते. या रस्त्याने ये-जा करताना परिणामी जनावरांना चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात झाले आहे. या मार्गावर जुनापाणी चौक परिसरात रस्ता उखडला आहे. तसेच उर्वरीत भागात खोल खड्डे पडले आहे. रस्त्यावील खड्डे चुकविण्यासाठी जडवाहने रस्त्याच्या कडेने वाहन घेऊन जातात. परिणामी यात रस्त्याच्या कडा खचत आहे. रस्त्याची अत्यंत दैना झाली आहे. उरलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकले जात असल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे असे अन्न टाकण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने या खड्ड्यांची त्वरीत डागडुजी करावी अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक करीत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात बळावले आहे.या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती कोणाकडे आहे याबाबत संभ्रम असल्याने याची डागडुजी होत नसल्याचे दिसते. यासाठी निधी आला नसल्याचे सबंधीत विभागाकडून सांगण्यात येते.