शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुली बंद करा

By admin | Updated: March 22, 2017 00:57 IST

तालुक्यातील शेतकरी मागील ४ वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात अडकले असतांना बॅकेमार्फत कर्ज वसुली सुरू आहे.

निखिल कडू यांची निवेदनातून मागणी आर्वी : तालुक्यातील शेतकरी मागील ४ वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात अडकले असतांना बॅकेमार्फत कर्ज वसुली सुरू आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आणि कधी गारपिटीने शेतकऱ्यांचे कमरडे मोडले आहे. शेती उभारण्याकरीता तसेच शेती पुरक साधन खरेदी करीता बँकेकडून घेतलेल्या कजार्ची परतफेड करणे शेतक-यांना आजच्या घडीला शक्य नाही. आर्थिक अडचणीने शेतक-यांना जिवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सक्तीने सुरू असलेली कर्ज वसूली तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे. बँकेकडून कर्ज भरण्यासाठी तगादा लावल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. शेतीकरीता कर्ज घेऊन घेतलेले ट्रॅक्टर आदी साहित्य जप्त करणे सुरू आहे. विविध बँका कर्जवसुलीकरिता शेतकऱ्यांना धारेवर धरत आहेत. यात महाराष्ट्र बँक पुढे आहे. शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त उपजिविकेसाठी कुठलाही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यातूनच ते मुलांचे शिक्षण, मुला-मुलींची लग्न, कुटुंबाचे पालनपोषण करतात. सध्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कुटुबाचे पालन-पोषण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्ज वसुली बाबत जर बॅकेचे असेच धोरण असेल तर शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्नदात्यालाच बँकेकडून कर्जवसूलीकरिता नाहक त्रास दिल्या जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून बँकेमार्फत शेतकऱ्याची कर्ज वसुली तात्काळ बंद करावी, अशी मागणी सर्कसपूरचे उपसरपंच तथा भाजपा पदाधिकारी निखिल कडू यांनी निवेदनातून केली आहे. मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)