शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गौण खनिज उत्खनन बंद करा

By admin | Updated: July 12, 2014 23:50 IST

देवळी नजीकच्या गिरोली (ढगे) परिसरात सुरू असलेले स्टोन क्रेशर व उत्खनन त्वरित बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतमध्ये विशेष सभेचे आयोजन केले आणि ठराव घेवून सगळ्या

वर्धा : देवळी नजीकच्या गिरोली (ढगे) परिसरात सुरू असलेले स्टोन क्रेशर व उत्खनन त्वरित बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतमध्ये विशेष सभेचे आयोजन केले आणि ठराव घेवून सगळ्या स्टोन क्रेशर आणि उत्खननचे ना हरकत रद्द केले आहे. गत वर्षभरापासून स्टोन व्यवसाय बंद करण्यासाठी आणि गावाला या संकटातून वाचविण्यासाठी गावकऱ्यांचा लढा सुरू आहे.वर्षभरापासून गिरोली ग्रामस्थ आपल्या हक्कासाठी विविध मार्गाने लढत आहे. परिसरात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन आणि क्रेशर बंद पाडण्यासाठी शक्य ते उपाय गवकरी करीत आहे. दरम्यान गटविकास अधिकारी सेलू यांच्या आदेशन्वये गिरोली ग्रामपंचायतची विशेष ग्राम सभा घेण्यात आली आणि स्टोन व्यवसाय बंद करण्याच्या बाजूने ठराव घेण्यात आला. ज्यामध्ये २४२ पैकी २२६ लोकांनी ठरावाच्या तर १६ लोकांनी ठरावाच्या विरूद्ध मत दिले. ग्रामसभा अध्यक्ष रामभाऊ दुधाबडे यांनी ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. ग्रामसभेला सरपंच आशा भोंगाडे, ग्रामसचिव लांजेवार, विस्तार अधिकारी कांबळे, पंचायत समिती अधिकारी, नायब तहसीलदार एस. आर. यादव, अव्वल कारकून यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. या आधी २३ जानेवारी २०१४ ला गिरोली ग्रामवासी यांनी विशेष ग्रामसभेत गौण खनिज उत्खनन व स्टोन क्रेशर बंद करण्याचा १६१ विरुद्ध २० मतानी ठराव पारित केला होता. जिल्हाधिकारी वर्धा संबंधित अधिकाऱ्यांना ठरावाची प्रत देण्यात आली. त्यावर काहीच कार्यवाही न झाल्यामुळे गावकऱ्यांनी दुसरी विशेष ग्रामसभा ५ जुलै २०१४ रोजी घेतली. त्यात २२६ विरुद्ध १६ मतानी ठराव बहुमतानी पारित केला. गावाला लागून ६०० मिटर अंतरावर गुप्ता स्टोन क्रेशर व गणेश स्टोन चालू आहे. संबंधित ग्राम सभा ठराव हा जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडून केव्हा आणि कशी कारवाई केली जाईल याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)