शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
2
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
3
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
4
पंक्चर दुकानाचा मालक आणि व्यवसायाने ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
5
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
6
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
7
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
8
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारचे सहकार्य: देवेंद्र फडणवीस
9
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
10
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या
11
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
12
मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
13
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी
14
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर
15
'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
16
लग्न, घटस्फोट अन् आता पुन्हा साखरपुडा... २ वर्षात दोनदा 'प्रेमात'; दुबईची राजकुमारी चर्चेत
17
त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा
18
Pakistan Flood : पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार
19
Jio IPO: जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
20
Samsung Galaxy A17: २० हजारांत जबरदस्त फीचर्स; सॅमसंगच्या 5G फोनची बाजारात एन्ट्री!

तुलसी,राशी कंपनीच्या वाणावर सर्वाधिक बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:38 IST

आर्वी तालुक्यातील हरदोली, रसुलाबाद, पिंपळगाव, माळेगाव (ठेका) आदी शेतशिवारातील कपाशी पिकावर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा शासनाकडे अहवाल रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील हरदोली, रसुलाबाद, पिंपळगाव, माळेगाव (ठेका) आदी शेतशिवारातील कपाशी पिकावर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळी तुलसी आणि राशी कंपनीच्या कपाशीच्या वाणावर आढळून आला असून तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात कपाशी पिकाचे नियोजन एकूण २,३५,५०० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आले. तर जिल्ह्यात पिकाचे सरासरी क्षेत्र २,०४,२०३ हेक्टर असून सध्यास्थितीत एकूण २,३४,९५७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नियोजनाच्या क्षेत्राच्या तुलनेत ११५.०६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे तुरळक क्षेत्रामध्ये कपाशी पीक लाल-पिवळे पडत आहे. तर आर्वी तालुक्यातील हरदोली, रसुलाबाद, पिंपळगाव, माळेगाव (ठेका) शेतशिवारातील तुलसी व राशी या कंपनीच्या कपाशीच्या वाणावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला वेळीच आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे, अशा सूचना शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने गावतापळीवर दिल्या जात आहे. विशेष म्हणजे तुलसी व राशी कंपनीच्या कपाशीच्या पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे पाठविला आहे.शिवाय सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. मात्र, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सेलू तालुक्यातील धपकी, देवळी तालुक्यातील हुरदनपूर व आर्वी तालुक्यातील माळेगाव (ठेका) शेतशिवारातील सोयाबीन पिकावर उंटअळी दिसून आल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.मागील दोन वर्षे गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर टाकली. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले. त्यामुळे आर्थिक फटकाच कपाशी उत्पादकांना सहन करावा लागला होता. मात्र हंगामाच्या शेवटी शासनाने नुकसानग्रस्तांना तोकडी मदत दिली. तर अनेक नुकसानग्रस्तांना अद्यापही शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.कामगंध सापळे ठरणार फायद्याचेसततच्या पावसामुळे कपाशी पीक लाल-पिवळे पडत असल्याने शेतकºयांनी शेतातील पाणी बाहेर कसे काढता येईल यासाठी प्रयत्न करावे.शिवाय मलुल झालेल्या झाडांच्या बुडात २ ते ३ ग्रॅम युरीया द्यावा. कपाशीचे झाड पायाच्या बोटात धरून दाबावे.कॉपर आॅक्सिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक १५० गॅ्रम युरिया व १५० ग्रॅम पोटॅश प्रती लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण प्रती झाड १५० ते १५० मि.ली ड्रेनचिंग करून द्यावे. याच द्रावणाची पिकावर फवारणी केल्यास ते फायद्याचे ठरणारे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे शेतकºयांनी शेतात लावावे, असेही सांगण्यात आले.३४ शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना दिली जातेय इत्थंभूत माहितीजिल्ह्यात तूर पीक कपाशी व सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून घेण्यात येते. सध्यास्थितीत जिल्ह्यात एकूण ५९,४९४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. नियोजनाच्या ९१.५३ टक्के क्षेत्रावर झाली असून सरासरीच्या तुलनेत ७९.७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्यास्थितीत पीक वाढीव अवस्थेत असून पिकाचे उत्पादन वाढ, कीड व रोग व्यवस्थानाबाबत एकूण ३४ शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना इत्तमभूत माहिती दिली जात आहे.सोयाबीनवर हिरवी-करडी उंटअळीचा हल्लासध्यास्थितीत जिल्ह्यात एकूण १,०७,२२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. नियोजनाच्या क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर सरासरीच्या तुलनेत ६८.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून सध्या सोयाबीन पीक वाढीव अवस्थेत आहे. शिवाय पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. मात्र, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सेलू तालुक्यातील धपकी, देवळी तालुक्यातील हुरदनपूर आणि आर्वी तालुक्यातील माळेगाव (ठेका) शेतशिवारातील सोयाबीन पिकावर उंटअळी दिसून आली आहे.पक्षीथांबे ठरणार उपयुक्तउंटअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकºयांनी शेतात पक्षीथांबे लावल्यास पक्षी ही अळी फस्त करेल. त्यामुळे उंटअळीला अटकाव घालता येता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करता येते. किडीचे आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास (सरासरी ४ अळ्या प्रती मिटर ओळ) नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ४० टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पानाच्या खालच्या बाजूने केल्यास त्याचे परिणाम उत्कृष्ट मिळत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती