शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारांची लाच स्वीकारताना तलाठी गजाआड

By admin | Updated: July 15, 2015 02:39 IST

तालुक्यातील लहान वणीचे तलाठी गणेश तमगीरे यांना तीन हजारांची लाच घेताना डॉ. आंबेडकर चौकातील एका दुकानात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

हिंगणघाट : तालुक्यातील लहान वणीचे तलाठी गणेश तमगीरे यांना तीन हजारांची लाच घेताना डॉ. आंबेडकर चौकातील एका दुकानात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सांयकाळी ५.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट येथील चोखोबा वॉर्डातील नरेंद्र भगत याच्या पत्नीच्या नावे लहान वणी येथे सहा एकर शेती आहे. त्यांना गत वर्षीच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानापोटी शासनाकडून मार्च २०१५ मध्ये १० हजार रुपयांची मदत जाहीर झाली. ती रक्कम मिळण्याकरिता या मदतीमधील तीन हजार रुपयांची मागणी तलाठी तमगीरे यांनी केल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. यावरून येथील आम आदमी पार्टीच्यावतीने मंगळवारी सकाळी शहरात भ्रष्ट प्रशासन व शासन अधिकाऱ्याविरूध्द पत्रक वितरीत करण्यात आले. त्यामुळे फिर्यादी भगत यांनी आरटीआय कार्यकर्ते मनोज रूपारेल यांच्याशी संपर्क साधून लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून सायंकाळी डॉ. आंबेडकर चौकात तक्रार कर्त्याच्या टेलरिंगच्या दुकानात तमगीरेला तीन हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी किशोर सुपारे, पोलीस निरीक्षक अनिरूध्द पुरी, एएसआय प्रदीप देशमुख, शिपाई कुणाल डांगे, अनुप राऊत, रागीनी हिवाळे, पल्लवी बोबडे, श्रीधर उईके यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)