शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालय झाले डोकेदुखी

By admin | Updated: June 1, 2015 02:25 IST

शहरातील मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर दिवसभर थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते.

सुधीर खडसे  समुद्रपूरशहरातील मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर दिवसभर थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. बँड, डीजे, फटाक्यांचे कर्णकर्कश आवाज व उघड्यावर टाकलेल्या उष्ट्या अन्नामुळे दुर्गंधी पसरली आहे. हा प्रकार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. समुद्रपूर ते उमरेड मार्गावर प्राध्यापक कॉलनीत सदर मंगल कार्यालय आहे. येथे दररोज होणारे लग्नसोहळे परिसरातील नागरिकांना मनस्ताप देणारे ठरत आहे. कार्यालयासमोर वाहनांची पार्कींग व्यवस्था नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच दुचाकी, चारचाकी वाहनांची रांग लागते. यामुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होतो. नवरदेवाच्या वरातीसोबत बँडवर नाचणारे मद्यधुंद टोळके वाहतुकीचे सारेच नियम धाब्यावर बसवितात. अनेकदा नाचता-नाचता गावातील ज्येष्ठ नागरिकांशी असभ्य वर्तन करून मारामारीपर्यंत प्रकरणे जातात; पण वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसते. वाहतुकीचा पचका, अन्नाची दुर्गंधी आणि दररोज होणारी भांडणे या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील अन्य भागातील मंगल कार्यालयेही नागरिकांकरिता डोकेदुखीच ठरत आहे. तालुका प्रशासनासह पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देत संबंधित सभागृहाच्या मालकांसह संबंधितांना समज देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.